शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

विनोदी माणसं दीर्घायुषी व्हावीत

By admin | Updated: July 17, 2017 04:25 IST

विनोद सांगणे ही एक कला आहे.विनोदामुळे आपल्या सर्वांचे आयुष्य खूप सुखकर होते; पण हा विनोद निर्माण करणे व तो प्रेक्षकांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे: विनोद सांगणे ही एक कला आहे.विनोदामुळे आपल्या सर्वांचे आयुष्य खूप सुखकर होते; पण हा विनोद निर्माण करणे व तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या माणसाच्या आत काहीतरी दु:ख वसलेले असते; परंतु आपल्याला दु:खाची झळ विसरत विनोदकर्ता माणसाच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची रेषा उमटवतो. त्यामुळे आपण थोडावेळ तरी ताण-तणावातून दूर जातो. अशी विनोदी माणसं जगली पाहिजे, असे मत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी व्यक्त केले. मारुती यादव लिखित ‘हसरे जग’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंद्रकांत पांढरीपांडे, डॉ. न. म.जोशी, अनुराधा यादव आदी उपस्थित होते. मेहेंदळे म्हणाले की, काही विनोद हे काळाशी सुसंगत असतात. काही विनोद अजरामर झाले आहेत. शं. ना. नवरे नेहमी सांगायचे, विनोद, किस्सा सांगणे ही एक अवघड कला आहे. काही लोकं काय विनोद सांगतात ते कळत नाही तसेच त्यावर हसूही येत नाही. एकपात्री कार्यक्रम सादर करणे ही पण एक अनन्यसाधारण कला आहे. कोणतेही पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, सहकलाकारांशिवाय ही माणसं दोन- अडीच तास रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवत आनंद देतात. मारुती यादवांनी मनोगतात सांगितले, या जगात रडणारे व रडवणारे खूप लोकं आहेत. पण हसणारे आणि हसवणारे लोकं खूप कमी आहेत.आयुष्यात हे काम फार समाधान देते. पुण्यातील एकपात्री संस्थेतर्फे मारुती यादवांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बंडा जोशी, संतोष चोरडिया, वंदन नगरकर, वृंदा जोशी आदी कलाकार सहभागी होते. सूत्रसंचालन आनंद देशमुख, आभार प्रदर्शन संतोष चोरडिया यांनी केले.