शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

VIDEO: पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग; शेकडो दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 00:05 IST

huge fire at Fashion Street in Pune: अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी; अरुंद रस्ता असल्यानं आग विझवताना अडथळे

- विक्रम मोरे

पुणे: पुण्यातील कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली आहे. शेकडो दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या भागात अतिशय अरुंद जागा आहे. त्यात दाटीवाटीनं दुकानं आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. रस्ते अतिशय लहान असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत शिरताना अडथळे येत आहेत. सध्या घटनास्थळी पुणे महापालिकेसह पीएमआरडीएचे कर्मचारी पोहोचले आहेत.  पुण्यातील फॅशन स्ट्रीटला रात्री ११ च्या सुमारास भीषण आग लागली. हा परिसर अतिशय दाटीवाटीचा असून इथे शेकडो दुकानं आहेत. आग मोठी असल्यानं अग्निशमन दलाचे आणखी बंब घटनास्थळी बोलावण्यात आले आहेत. रस्ते अतिशय अरुंद असल्यानं आगीपर्यंत पोहोचणं अवघड जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकानं असल्यामुळे व्यापारीवर्ग आणि आजूबाजूला राहणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली आहे. त्यांना हटवण्याचं काम पोलिसांना करावं लागत आहे. या आगीमध्ये नेमकी किती दुकानं भस्मसात झाली, आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुणे शहरातला अत्यंत जुना भाग म्हणून एमजीरोड ओळखला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीसाठी फॅशन स्ट्रीटवर कायम गर्दी असते.आगीत काही कोटी रुपयांचं नुकसान झालं असून आत जाण्यासाठी मार्ग नसल्यानं मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली आणि फॅशन स्ट्रीटच्या बाहेर अग्निशमन दलाच्या गाड्या थांबवत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फॅशन स्ट्रीटच्या सभोवताली, मोती बिल्डिंग, एम जी रोडवरील घरं, शहजहानंद अपार्टमेंट, समृद्दी अपार्टमेंट येथे मोठी लोकवस्ती आहे. त्यांनादेखील मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा बसल्या आहेत.कँटॉनमेंट परिसरात वर्षभरात चौथ्यांदा अशा प्रकारची घटना घडली आहे. गेल्या वर्षी कँटॉनमेंटच्या आयसीयूमध्ये आग लागली होती. महिन्याभरापूर्वीच चिल्ड्रन वॉर्डला आग लागली होती. १६ मार्चला कॅम्पमधीलच शिवाजी मार्केटला आग लागल्याची घटना घडली. २०१७ मध्ये मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनं फायर ऑडिट केलं. त्यात फॅशन स्ट्रीटचा उल्लेख धोकादायक असा करण्यात आला होता. इथली जवळपास सर्व दुकानं अनधिकृत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.