जळगाव : शिरसोली येथील जिजामाता कन्या विद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी आशा रमेश पाटील (१८) हिने शुक्रवारी दुपारी कौटुंबिक कारणातून विषप्राशन करून आत्महत्या केली. आशाचे आई-वडील शुक्रवारी सकाळी शेतात गेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिचा भाऊ आईवडिलांचा जेवणाचा डबा घेण्यासाठी घरी आला. त्या वेळी आशाच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्याला दिसले. त्याने तत्काळ तिला उपचारासाठी जळगावात आणले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. गुरुवारी आशाच्या लग्नाबाबत कुटुंबात चर्चा झाली होती. मात्र तिने स्वत:च्या पायावर उभे राहिल्यानंतरच लग्न करणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. तिच्या आई-वडिलांनी तिच्या मताला फारशे महत्त्व दिले नसल्याचे समजते.
बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Updated: February 21, 2015 02:55 IST