शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती बळी घेणार?

By admin | Updated: December 19, 2014 23:56 IST

कुठेही धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत; जे आहेत, ते वाचता येत नाहीत; सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी असलेल्या जागा,

लक्ष्मण मोरे, पुणेपुणे : कुठेही धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत; जे आहेत, ते वाचता येत नाहीत; सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी असलेल्या जागा, दुभाजक तोडून तयार केलेले ‘पंक्चर’ अशी अवस्था आहे कात्रज बोगदा ते नऱ्हे पुलादरम्यानची. मानवी चुका, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि चुकीचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ याची शिक्षा निरपराधांना आपले प्राण गमावून मोजावी लागत आहे. शुक्रवारी सकाळी दरीपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा बळी गेला. रस्त्याची चुकीची आखणी, वाहतुकीचे नसलेले नियोजन आणि बेशिस्त वाहनचालक ही येथील अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दुरदृष्टीच्या अभावामुळे आणि ठेकेदारांशी असलेले लागेबांधे जपण्यासाठी महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. वाहतूक पोलिसांनी अपघातप्रवण क्षेत्र आणि रस्त्यामधील दुरुस्त्यांसंदर्भात अहवाल देऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे वास्तव आहे. कात्रज बोगदा, नऱ्हे पूल आणि दरीपूल हा भाग मुंबई-बंगळुरु महामार्गावरील अपघातांमध्ये सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. ‘लोकमत’ने शुुक्रवारी या अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केली. काही ठिकाणी मानवी चुकांमुळे, तर काही ठिकाणी बांधकामातील चुकांमुळे अपघाती क्षेत्र तयार झाले आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि पुलाच्या कामांमध्ये फारशी प्रगती झालेली नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. (प्रतिनिधी)