शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘रायगड पूर्वी कसा होता?’तून जिवंत झाला किल्ल्याचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:32 IST

इतिहास प्रेमी मंडळच्या वतीने ‘रायगड पूर्वी कसा होता?’ या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साउंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिंवत केला.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचा इतिहास हा बखरीच्या पानात नसून तो गडकिल्ल्यात आहे : रामचंद्र देखणे रायगडाची प्रतिकृती आणि लाईट साउंड शो करणार्‍या विद्याथ्यार्चां देखणे यांच्या हस्ते सत्कार

पुण : महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा भूगोल बदलवणारा इतिहास आहे. प्रत्येक माणसामध्ये चेतना पेटवणारा इतिहास आहे़ महाराष्ट्राचा इतिहास हा बखरीच्या पानात नसून तो गडकिल्ल्यात आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. इतिहास प्रेमी मंडळच्या वतीने ‘रायगड पूर्वी कसा होता?’ या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साउंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिंवत केला. यावेळी व्यासपीठावर शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, प्रा. मोहन शेटे सर उपस्थित होते. यावेळी ३२ मिनिटात लिंगाणा किल्ला सर करणारे अनिल वाघ आणि आग्रा ते राजगड पायी प्रवास करणारे व ५ वर्षात ५१४ किल्ले चढणारे मारुती गोले यांना साहसवीर पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.देखणे म्हणाले, परमार्थ आणि पुरुषार्थ यांचा समन्वय असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये भक्तीचा आणि शक्तीचा अनोखा संगम झाला आहे. कधी कधी वेडी माणसेच समाजाच्या भल्यासाठी शहाणपणाचे  काम करतात. महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक सजीवाला प्रेरणा देणारा इतिहास आहे़ कदम म्हणाले, इतिहास प्रेमी मंडळ सातत्याने नवनवे उपक्रम राबवित असते. यावेळी राबवलेला प्रयोग हा अत्यंत वेगळा आणि अभिमानास्पद आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे पाच एकर जागेमध्ये रायगडाची प्रतिकृती तयार करणार आहे़ नर्‍हे-आंबेगावला ३०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज अशी शिवसृष्टी व संस्कार केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी  सांगितले. पुरस्काराला उत्तर देताना मारुती गोले म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा आहे. या पुरस्काराने मला आणखी ऊर्जा दिली आहे. अनिल वाघ म्हणाले, माझ्या जीवनातील आदर्श हे तानाजी मालुसरे आहेत़ लिंगाणा चढताना मी तानाजी मालुसरे यांचे स्मरण करत होतो. भविष्यामध्ये सायकलने किल्ले चढण्याची मोहीम आखणार आहे़  मोहीम आखणार आहे. यावेळी रायगडाची प्रतिकृती आणि लाईट साउंड शो करणार्‍या विद्याथ्यार्चांही देखणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मोहन शेटे यांनी प्रास्ताविक केले व प्रणव जोशी यांनी आभार मानले.

टॅग्स :RaigadरायगडFortगड