शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

मंचर रुग्णालयात रुग्णाची हेळसांड

By admin | Updated: October 28, 2015 01:12 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासी रुग्णांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट प्रतीची सेवा व दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासी रुग्णांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट प्रतीची सेवा व दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्यामुळे आदिवासी भागातील रुग्णांच्या आरोग्याची या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मारुती धोंडू केंगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. डोंगरदऱ्यांमध्ये आदिवासी लोक राहतात. या भागात छोटी-छोटी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. किरकोळ आजारांसाठी या आरोग्य केंद्रांमध्ये प्रथमोपचार केले जातात. या भागात राहणाऱ्या आदिवासी जनतेची आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती आहे. आपल्या पोटाची खळगी भरता-भरता या भागातील आदिवासी बांधवांच्या नाकी नऊ येतात, तर मोठ्या आजारांच्या उपचारांसाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न आदिवासी जनतेला भेडसावत आहे. या रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतूने मंचर येथे कोटी रुपये खर्च करून भव्य उपजिल्हा रुग्णालय उभारले. मात्र या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. आदिवासी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण व परिसरातील जनता या रुग्णालयाकडे धाव घेते; परंतु या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार हे अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरून निकृष्ट पद्धतीची सेवा व अरेरावीच्या भाषेत दुय्यम दर्जाची वागणूक देत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आदिवासी भागातील ज्येष्ठ आदिवासी नेते मारुती धोंडू केंगले यांना आला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे या गावात राहणारे शंकर काळू केंगले यांना तीन दिवसांपूर्वी अचानक गुचकी व कमरेला जीव नसल्याचा त्रास जाणवू लागला. शंकर केंगले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले; परंतु त्यांना काही फरक न पडल्यामुळे अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील कर्त्या पुरुषाला होणाऱ्या त्रासामुळे संपूर्ण कुटुंब हादरले. आदिवासी नेते मारुती केंगले यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वत:हून तातडीने रुग्णाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हालविले. परंतु, तेथे वैद्यकीय अधिकारी गणेश पवार यांनी रुग्णाला न तपासता त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली. तसेच त्यांच्यावर उपचार न झाल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल व्हावे लागले. (वार्ताहर)