पुणे : पतीला योग्य उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना अवघ्या तेविसाव्या वर्षी वैधव्य आले. सोबत चार लहान मुलांची जबाबदारी होती. अशा स्थितीत त्यांनी गरिबांना मोफत उपचार देण्यासाठी रुग्णालय उभारण्याचा निर्धार केला. भाजीपाला विकून, धुणीभांडी करून २० वर्षाहून अधिक काळ त्यांनी पैसे जमा केले. मुलाला अनाथालयात ठेवून डॉक्टर बनवले आणि शेवटी जमवलेल्या पैशातून ज्या गावात पतीचा मृत्यू झाला. तिथेच मोठे रुग्णालय उभे केले. तिथे आता गरिब रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. या निश्चयाच्या महामेरू आहेत पश्चिम बंगालच्या ७५ वर्षीय सुभासिनी मिस्त्री. पुण्यात गुरूवारी (दि.२१) आरोग्य महोत्सव होत असून त्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला व त्यांनी आपला जीवनपट उलगडला. अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनी यांचे लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुले खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. वेळेवर त्यांच्या पतीला उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. तेव्हा सुभासिनी यांचे वय २३ होते. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्री यांनी ठरवले की, असे हॉस्पिटल काढायचे ज्यात गरिबांना मोफत उपचार मिळेल. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर अनेक जण हसले होते. पण ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडेच मी हॉस्पिटल काढेन, असे त्यांनी तेव्हा निक्षून सांगितले.तेव्हा चार मुलांची जबाबदारी पण त्यांच्यावर होती. हॉस्पिटल तर सोडाच पण स्वत:च घर नीट करून दाखव अशी लोकांनी त्यांची अवहेलना केली होती. पण सुभासिनी मिस्त्री यांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामे करून महिन्याला १०० रुपये मिळत होते. आपल्या मुलांना त्यांनी अनाथाश्रमात ठेवले आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. बँकेत आपले खाते सुरु केले. आपल्या मुलांची शिक्षण आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते बँकेत टाकले. तब्बल २० वर्ष हे काम प्रामाणिकपणे करत राहिल्या. १९९२ साली सुभासिनी मिस्त्री यांनी हन्सपुकुर या गावात १० हजार रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सगळ्यात लहान मुलाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी मिळवली होती. मग काय लोक येत गेली आणि कारवाँ बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्युम्यानिटी हॉस्पिटलने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता. .........................
भाजीपाला विकून गरिबांसाठी मोफत उपचारासाठी उभारले रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 07:00 IST
अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनी यांचे लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुले खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला.
भाजीपाला विकून गरिबांसाठी मोफत उपचारासाठी उभारले रुग्णालय
ठळक मुद्देसुभासिनी मिस्त्री यांचे कार्य : पैसे नसल्याने पतीचा झाला होता मृत्यू ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामे करून महिन्याला १०० रुपये मिळतआईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान मुलाने मिळवली डॉक्टरची पदवीभारत सरकारकडून त्यांच्या या कार्याचा गौरव यंदा पद्मश्री पुरस्कार देऊन