शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

घोडीसाठी मोजले तब्बल १५ लाख

By admin | Updated: December 15, 2014 01:51 IST

हौस माणसाला काय करायला लावत नाही़ हौसेसाठी माणूस जग पालथे घालताना दिसतो़ कोणाला महागड्या गाड्या जमविण्याचा छंद असतो

उरुळी कांचन : हौस माणसाला काय करायला लावत नाही़ हौसेसाठी माणूस जग पालथे घालताना दिसतो़ कोणाला महागड्या गाड्या जमविण्याचा छंद असतो, तर कोणाला जातिवंत घोडे पाळण्याचा छंद असतो़ या छंदापायीच काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या दारात चक्क मर्सिडिज गाडी दिसत होती़ लोणी काळभोर येथील महाराष्ट्र केसरी पै़ राहुल काळभोर यांनी सारंगखेडा येथील प्रसिद्ध घोडेबाजारातून तब्बल १५ लाख रुपये देऊन रिना ही घोडी खरेदी केली आहे़ रिना ही संपूर्ण तालुक्यात कुतुहलाचा विषय झाला असून, गेल्या काही दिवसांपासून तिला पाहण्यासाठी दररोज पन्नास ते साठ नागरिक काळभोर यांच्या घराला भेट देत आहेत़ तिच्या देखणेपणाची सर्वत्र चर्चा आहे़ याबाबत राहुल काळभोर म्हणाले, की नंदुरबार  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपालसिंह सरदारसिंह रावल हे माझे जवळचे मित्र आहेत. ते सारंगखेडामधील  राजांचे  वंशज आहेत.  त्यांच्या  राजवाड्यासमोरच हा घोडेबाजार गेली ३५५ वर्षे भरत आहे. जयपालसिंह  रावल हे आमदार  जयकुमार रावल  यांचे  मामा  आहेत.  जयपालसिंह  रावल यांच्या आमंत्रणानुसार यंदा या घोडेबाजाराचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले़ उत्तर प्रदेश राज्यातील  धौरातोंडा येथील  विक्रेते खलीफ अब्दुल करीम यांनी  ही  घोडी विक्रीसाठी  बाजारात आणली होती. सुरुवातीला त्यांनी तिची किंमत २१ लाख रुपये सांगितली होती़ रावल यांच्या मध्यस्थीमुळे खलीफ करीम यांनी पंधरा लाख रुपयांना घोडी आम्हाला विकली आहे. त्यांनी तिचे नाव चांदणी ठेवले होते़ आम्ही तिचे रिना असे नवे नामकरण केले आहे़ मी लहान असताना आमचे आजोबा विठ्ठल पिराजी काळभोर यांच्याकडे एक घोडा होता़ ही गोष्ट माझ्या मनात ठेवून एक हौस म्हणून मी ही खरेदी केली आहे़ (वार्ताहर)