शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

जुन्नरमध्ये बिबटयाची दहशत

By admin | Updated: May 27, 2015 23:15 IST

पिंपळगाव जोगा येथील बोकडदरा येथे राहणाऱ्या सखुबाई नानाभाऊ हिले (वय ६०) या महिलेस घरापासून उचलून नेऊन बिबट्याने जंगलात ठार केले.

हल्ल्यात महिला ठारमढ/ओतूर : जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याची दहशत संपता संपेना. त्याचे माणसांवरचे हल्ले सुरूच असून मंगळवारी (दि. २६) पिंपळगाव जोगा येथील बोकडदरा येथे राहणाऱ्या सखुबाई नानाभाऊ हिले (वय ६०) या महिलेस घरापासून उचलून नेऊन बिबट्याने जंगलात ठार केले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या बाबत ओतूरचे वनक्षेत्रपाल एस.एस. रघतवान व पिंपळगाव जोगा येथील वनसेवक डी.एस.कदम यांनी माहिती दिली की, पिंपळगाव जोगा, बोकडदरा येथे सखुबाई या रात्री १० च्या सुमारास घराबाहेर लघुशंकेसाठी बसल्या होत्या. तेव्हा बिबट्याने हल्ला करुन त्यांना उचलून जंगलाच्या दिशेने नेले. आवाज येताच घरच्यांनी पाहिले व नाना हरिभाऊ हिले व गोंविद नाना हिले यांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. परंतु, बिबट्या त्यांना चकवून जंगलात पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव जोगा ग्रामस्थ, ओतूर वनक्षेत्र कर्मचारी व ओतूर पोलीसांनी जंगल परिसरात शोधकार्य सुरूकेले. तब्बल पाच तासांनी पहाटे तीनच्या सुमारास सखुबाई हिले यांचा मृतदेह जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्यांच्या घरापासून साधारणत: ५०० मीटर अंतरावर आढळला. ओतूर येथे शवविच्छेदन करुन तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. घटनेच्या ठिकाणी रात्रीच जुन्नरचे उपवनसंरक्षक वि.अ. धोकटे, सहायक वनसंरक्षक वाय.एल. केसकर यांनी भेट दिली. पिंपळगाव जोगातील बोकडदरा ही वस्ती डोंगराच्या जवळ पायथ्याला जंगलाजवळच आहे. पाच-सहा घरांची वस्ती व घरेही अंतरा-अंतरावर आहेत. सखुबाई हिले यांच्या घरात पती नानाभाऊ हिले, मुलगा गोविंद हिले, सून वृषाली हिले तर नात प्राजक्ता हिले व साहिल हिले असा परिवार राहतो. बिबट्याने सखुबाईंना घरापासूनच उचलून नेल्याने येथे राहणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीडित कुटुंबाला वनविभागाकडून तातडीची एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पिंपळगाव जोगातील वाड्यावस्त्यांवर पाहणी करून आजच तीन पिंजरे लावणार आहेत. डिंगोरे, ओतूर, खामुंडी या परिसरात आठ पिंजरे लावलेले आहेत. जंगल परिसर एकदम जवळ असल्याने संगमनेरवरून अधिक पाच पिंजरे मागविण्यात आले आहेत. तेही लवकरच लावण्यात येतील. बोकडदरा परिसरात ट्रॅप लावण्यात येणार असून, ट्रॅप कॅमेरेही बसवणार आहे.- एस. एस. रघतवान, वनपरिक्षेत्र अधिकारी४लोकांनी घराजवळील परिसरात लाइट सुरू ठेवावेत, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, शेतात व इतर ठिकाणी समूहाने फिरावे, सोबत मोठ्या आवाजाचे यंत्र वापरावे, पाळीव व दुभत्या जनावरांचा गोठा बंदिस्त करावा, बिबट्याचा वावर अढळला, तर त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.४वीज महामंडळाने या बिबट्याप्रवण क्षेत्रात रात्रभर सिंगल फेज लाइट द्यावी; दिवसा शेतीपंप चालविण्यासाठी थ्री फेज मोटारची पूर्ण क्षमतेने लाइट द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.