शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

त्या ३४ गावांच्या आशा झाल्या पल्लवीत

By admin | Updated: May 4, 2017 02:12 IST

महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावाचा प्रश्न तसा २० वर्षांपासूनचा प्रलंबित आहे. सर्वप्रथम १९९७ मध्ये युती शासनाच्या काळात

पुणे : महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावाचा प्रश्न तसा २० वर्षांपासूनचा प्रलंबित आहे. सर्वप्रथम १९९७ मध्ये युती शासनाच्या काळात महापालिकेची हद्दवाढ झाली होती. नंतर त्यातील काही गावे वगळण्यात आली. त्यानंतर हद्दीलगतच्या ३४ गावातील प्रश्न मुलभूत सुविधाअभावी जटील बनत गेले आणि ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली. महापालिका हद्दीलगतच्या सुस, धायरी, खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, आंबेगाव, नऱ्हे ही गावे हवेली तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती आहेत. शहराजवळ असल्याने व तुलनेने सदनिकांचे दर कमी असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. बेकायदा बांधकामे. अपुऱ्या नागरी सुविधा असल्यातरी नागरिक गैरसोयी सोसून या भागात राहत आहेत.हवेली तालुका नागरी कृती समितीने या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलने केली. या सर्वपक्षीय मोहिमेची दखलही शासनाला घ्यावी लागली. नव्याने निवडून आलेल्या राज्य शासनाने गावाच्या समावेशाबाबत चालढकल सुरू केल्याने समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर गेली वर्षभर युक्तिवाद होत गेले. महापालिका निवडणुकीनंतर या प्रश्नाची उकल होणार असे दिसत होते. मात्र, पुन्हा निर्णय पुढे ढकलला गेला. अखेर २७ एप्रिलला खंडपीठाने शासनाला आठ दिवसाची अंतिम मुदत दिली व ४ मे रोजी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, खासदार, पालकमंत्री व समितीच्या सदस्यांना याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे स्पष्ट केले होते. त्यावरूनच उद्या (गुरुवारी) शासन न्यायालयात या गावांचा समावेश महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत निर्णय जाहीर करणार आहे. महापालिका हद्दवाढीचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह व सुनियोजित विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया वडगाव-धायरीचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी व्यक्त केली. ३४ प्रशासनावर बोजा वाढणार असला तरी पुणे महापालिका तो स्वीकारण्यास सक्षम आहे. दोन महापालिका केल्यास विकास व प्रशासनाच्या दृष्टीने योग्य ठरेल, असेही चरवड यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया थांबणारया ३४ गावातील बहुसंख्य भागात महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. तेथील कचराही मनपाच उचलते. या गावाचा बोजा वागवण्याऐवजी सरळ ही गावे महापालिकेतच समाविष्ट करणे योग्य ठरेल, अशी भूमिका हद्दीलगतच्या प्रभागातील नगरसेवकाचीही आहे. ३४ गावातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी तसे ठराव करूनही शासनाकडे पाठवले. ३४ गावांतील १६ गावांत ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, समावेशाचा निर्णय अपेक्षित असल्याने अजूनही फारशी रंगत नाही. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास निवडणुकांची प्रक्रिया थांबवावी लागणार आहे.