शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीबाबत आशा पल्लवित

By admin | Updated: September 27, 2016 04:30 IST

स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश होऊ शकतो. स्मार्ट सिटी समावेशाबाबत

पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश होऊ शकतो. स्मार्ट सिटी समावेशाबाबत शहरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडला ९२.५० गुण मिळवून डावलल्यानंतर शहरातील नागरिक, राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. स्मार्ट सिटीच्या परीक्षेत शहराबाबत राजकारण झाले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी पक्षांनी केला होता. त्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि स्थानिक खासदार, आमदारांनीही नगरविकास खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन शहराला स्मार्ट सिटीत समाविष्ट करा, अशी मागणी केली होती. त्या वेळी नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी राज्य सरकारकडे बोट दाखविले होते.२०१५मध्ये १०० शहरांची यादी नगरविकास खात्याने प्रकाशित केली होती. या योजनेनुसार २०१६ या वर्षात ४० शहरांची नावे जाहीर करण्यात येणार होती. त्यानुसार जानेवारी महिन्यात पहिली यादी प्रसिद्ध झाली. त्यात २० शहरांचा समावेश होता. त्यानंतर मे महिन्यात १३ शहरांची यादी जाहीर झाली. त्यानंतर तिसरी यादी जाहीर झाली. त्यातही महाराष्ट्रातील पाच शहरांचा समावेश होता. मात्र, पिंपरी-चिंचवडचा समावेश नव्हता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली. केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या प्रश्नाबाबत भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्मार्ट सिटी समावेशाबाबत चर्चा केली. (प्रतिनिधी)‘स्मार्ट’बाबत मुख्यमंत्री अनुकूलपिंपरी : केंद्र सरकारने नवी मुंबई महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला आहे. परंतु, सत्ताधारी राष्ट्रवादीने स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्याबाबत अनुत्सुक आहेत. त्यामुळे नवी मुंबईऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला शिफारस करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीआहे. अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर रद्द करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार जगताप यांनी नुकतीच भेट घेतली. आमदार जगताप म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने देशातील १०० शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरे आहेत. या दहा शहरांनी निकष पूर्ण केल्यानंतर त्यांचा टप्प्याटप्प्याने स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला जात आहे. दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. नवी मुंबई महापालिका स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्याबाबत अनुकूल नसेल, तर राज्यातील अन्य शहरांचा या योजनेत समावेश होऊ शकतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या समावेशाबाबत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला आहे. त्यांनीही अनुकूलता दर्शविली.’’ अनधिकृत बांधकामांवरील शास्तीच्या मुद्द्याबाबत जगताप म्हणाले, ‘‘शहरात २००८नंतर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांना तिप्पट मिळकतकर आकारला जात आहे. हा कर रद्द करण्यासाठीही राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेकडून मूळ मिळकत करापाठोपाठ शास्तीकराचेही बिल पाठविले जात आहे. त्यामुळे शहरातील मिळकतधारक हैराण झाले आहेत. अनेक मिळकतधारकांकडे शास्तीकराची लाखोंची थकबाकी आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर रद्द करण्याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणीही केली आहे. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ’’