शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लरच्या मालक, मॅनेजरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:41 IST

पुणे : राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी आणल्यानंतरही हुक्का पार्लर चालू असलेल्या कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट रोडवरील हॉटेल ...

पुणे : राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी आणल्यानंतरही हुक्का पार्लर चालू असलेल्या कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट रोडवरील हॉटेल डार्क हॉर्सवर पोलिसांनी छापा घातला़ कोरेगाव पोलिसांनी हॉटेल मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल केला असून तेथे हुक्का ओढणाऱ्या २० तरुण-तरुणींवर खटले दाखल केले आहेत़

हॉटेल मालक प्रदीप प्रकाश परदेशी (रा़ माऊली निवास, बर्निंग घाट, कोरेगाव पार्क) आणि मॅनेजर सूरज पिटर थापा (रा़ कोरेगाव पार्क) अशी त्यांची नावे आहेत़

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हॉटेल डार्क हॉर्स येथे हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी सव्वा वाजता हॉटेलवर छापा घातला़ त्यावेळी हॉटेलमध्ये कोणतीही अग्निशामक यंत्रणा नव्हती़ कामगार हे निखारे हुक्का पॉटचे चिलीमवर ठेवत असताना दिसले़ या ठिकाणी १९ ते २५ वयोगटातील १२ तरुण व ९ तरुणी हुक्का ओढत असताना सापडले़ त्यांच्यावर खटले भरण्यात आले असून हॉटेल मालक व मॅनेजरवर गुन्हे दाखल केले आहेत़ पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस निरीक्षक गणेश माने व त्यांच्या सहकाºयांनी ही कारवाई केली़ शहरात हुक्का पार्लर चालविणाऱया हॉटेलवरील ही पहिलीच कारवाई आहे.

टॅग्स :Koregaon Parkकोरेगाव पार्कPuneपुणे