याप्रसंगी नटराजचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक बिरजू मांढरे, अभिजित चव्हाण, सुधीर पानसरे, अजिज शेख आदी उपस्थित होते.
नटराज नाट्य कला मंडळाकडून येथील शारदा प्रांगणातील नगरपरिषदेच्या शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत विविध कार्यक्रम पार पडले. या वेळी किरण गुजर यांच्या संकल्पनेतील हा कार्यक्रम अभिनव ठरला. या वेळी नटराजने लस घेण्यासाठी आलेल्या महिलांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या हस्ते केक कापत वाढदिवस साजरा केला.
लस घेण्यासाठी आलेल्या महिलांचा साडीचोळी देत सन्मान करण्यात आला. या वेळी याच महिलांच्या हस्ते केक कापण्यात आला. या वेळी उपस्थित ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आणि अन्य.
२२०७२०२१ बारामती—०२
—————————————
२२ जुलैसाठी पूर्ण पान जहिरात
असल्याने बातमी फोटोसह आवश्यक