याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. शांताराम महाराज गांगुर्डे, माजी उपमहापौर केशवराव घोळवे, उद्योजक प्रशांत संघवी, अधीक्षक कृष्णाजी ढाळे, अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त प्रकाश काळे, सदस्य अनिल वडगांवकर, प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सुर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, मुख्याध्यापक प्रदीप काळे, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले आदिंसह पालक विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आगळा-वेगळा शिक्षक दिवस कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. विनाअनुदानित शिक्षकांविषयी तळमळ व्यक्त करत त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती केली. विद्या गांगुर्डे या विद्यार्थिनीने सात वार वा शतदा जन्मून फिटायचे का ऋण हे हातून, आनंदाने टेकिंग माथा हेच मला भूषण अशा शब्दांतून शिक्षकांविषयीच्या भावना व ऋण व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, केशवराव घोळवे, प्रशांतजी संघवी, कृष्णाजी ढाळे, शांताराम गांगुर्डे, प्रकाश काळे, दिपक मुंगसे, अल्लाबक्ष मुलाणी, पूजा भोसले यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय देत मानवाच्या व देशाच्या विकासात शिक्षकांची भूमिका आणि आजच्या परिस्थितीत शिक्षकांचे स्थान सांगत सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिवले व शारदा साबळे यांनी केले. तर प्रदीप काळे यांनी आभार मानले.
०५ आळंदी
आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार करताना मान्यवर.