शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कोल्हापुरात धमकीच्या पत्राची आंदोलकांकडून होळी

By admin | Updated: June 30, 2017 17:21 IST

पुण्यातील ब्राम्हण महासंघाचा निषेध

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : पुजारी हटाओ मंदिर बचाओ, अंबा माता की जय च्या घोषणा देत श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनातील कार्यकर्त्यांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या पत्राची शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात होळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देणाऱ्या पूण्यातील अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. अंबाबाईला घागरा चोली नेसवल्यापासून गेल्या वीस दिवसांपासून कोल्हापुरात अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलन सुरु झाले आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण झाल्यानंतर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या सगळ््या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आंदोलनातील कार्यकर्ते दिलीप पाटील यांना दिलीप देसाई, सचिन तोडकर यांच्यासह तुम्हीही अंबाबाई मंदिर आंदोलनातून बाजूला व्हा अन्यथा पानसरेप्रमाणे बंदोबस्त करू अशा आशयाचे पत्र पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे पुण्यातील अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने सोशल मिडियावर व्हिडिओ पाठवून या प्रकरणाला ब्राम्हणविरोधी जातीयवादाचा रंग दिला आहे. या दोन्ही घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला व धमकीच्या पत्राची होळी करण्यात आली. यावेळी दिलीप देसाई म्हणाले, समन्वय बैठकीत पालकमंत्र्यांनी पुजारी हटाओ संदर्भात समिती स्थापन करा असे आदेश दिले आणि आठवड्याभरातच घुंमजाव केला. त्यामुळे भाजप सरकारकडून या प्रकरणात न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते. आंदोलनातून सर्वाचे लक्ष विचलित करुन करुन मुळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे, त्याकडे आम्ही दुर्लक्षच केले आहे. पुजारी हटाओचा निर्णय होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. डॉ. सुभाष देसाई म्हणाले, वर्षभरापूर्वी मला या पूजाऱ्याच्यावतीने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तेंव्हापासून पोलीसांनी एकाही पुजाऱ्याला अटक केलेली नाही. आता पून्हा तीन आंदोलकांना धमकीचे पत्र आले आहे. यावरुन पुजाऱ्यांना प्रतिगामी शक्तीचे पाठबळ असल्याचे सिद्ध होते. वास्तविक गुन्हे दाखल असलेला पूजारी अजित ठाणेकर याला तातडीने अटक करुन त्याची संपत्ती जप्त केली पाहीजे, पूजाऱ्यांवर आयकर खात्याने छापे टाकले पाहीजे. वसंतराव मुळीक म्हणाले, अवघे कोल्हापूर आता पुजाऱ्यांच्या मनमानी विरोधात बोलू लागले आहे. मुळ मागणीला बगल देण्यासाठी त्याला जातीचा लढा दाखवला जात आहे. आम्ही सुरवातीपासूनच सांगत आलो आहोत हा लढा जाती विरोधात नाही तर पूजाऱ्यांच्या विरोधात आहे. यावेळी आर.के. पोवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप पाटील, किशोर घाटगे, संजय पवार, जिजाऊ बिग्रेडच्या जयश्री चव्हाण, अ‍ॅड. चारुशिला चव्हाण, माजी नगरसेवक आदिल फरास, प्रकाश पाटील सरुडकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.

लाला जगतापांना भोवळ

या आंदोलनासाठी उपस्थित असलेले लाला जगताप यांना अचानक चक्कर येवून ते खाली पडले. आंदोलकांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले.