शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

इतिहासाचे साक्षीदार उपेक्षितच

By admin | Updated: January 11, 2017 02:21 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज हे तमाम मराठी जनतेचे आराध्यदैवत. शिवाजीमहाराजांचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात

भूगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज हे तमाम मराठी जनतेचे आराध्यदैवत. शिवाजीमहाराजांचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात; मात्र त्यांचे बलस्थान असलेले गडकिल्ले मात्र आजही उपेक्षित आहेत.मुळशी तालुक्यातील किल्लेही अपवाद नाहीत. त्यांच्या इतिहासाचे साक्षीदार जोपासणे, त्यांच्या स्मृती संवर्धन करणे आवश्यक आहे.मुळशी तालुक्यात कोराईगड, घनगड, कैलासगड व मावळ- मुळशीच्या सीमेवर असलेला तिकोणा हे किल्ले आहेत. गडावर अनेक लोक मांसाहार व मद्यप्राशन करण्यासाठी येतात. अनेक तरुण-तरुणी दगडावर स्वत:ची नावे कोरून ेऐतिहासिक वास्तूचे विद्रूपीकरण करतात. अनेक ठिकाणी पार्किंगबद्दलही समस्या आहेत. पर्यटक वाढल्यावर गावकरी पार्किंगचे मनमानी पैसे उकळतात. गडावर कोणत्याही परवानग्या न घेता मुक्काम करणे, गडावर आग लावणे, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या गडावर फेकणे, गडावर मद्यपान करणे, गडावर अन्न  शिजविणे, काचेच्या बाटल्या  फोडणे, गडावरील एखादा दगड हलवण्याचा प्रयत्न करणे हे प्रकार पाहावयास मिळतात. सर्वच ठिकाणी चंगळवाद कायमचा पाहायला मिळतो.  भारतीय पुरातत्त्व विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. याचा त्रास अन्य पर्यटकांना गावकऱ्यांना सहन करावा लागतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.किल्ले घनगड  :  या किल्ल्यावर शिवाजी ट्रेल ही संस्था दुर्गसंवर्धनाचे कार्य करते. गड अर्ध्यापर्यंत सोपा असल्याने मद्यपींचा हा अड्डा झाला असल्याचे दिसून येते. गडावरील निसरड्या व अवघड जागी या संस्थेने शिडी व रेलिंग बसवल्यामुळे पर्यटकांमध्ये वाढ झाली. परंतु गडावरील टाक्यांमधील गाळ, ढासळलेला बुरुज यामुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आहे.किल्ले तिकोणा  :  मुळशी व मावळच्या वेशीवर असणाऱ्या या किल्ल्यावर श्री शिवदुर्ग संवर्धन ही संस्था पुरातत्त्व खात्याच्या परवानगीने दुर्गसंवर्धनाचे कार्य करते. गडावर संस्थेने दोन किल्लेदार नेमले आहेत. पर्यटकांना अर्ध्यापर्यंत आल्यावर गूळपाणी देण्याच्या व्यवस्थेपासून गडाची साफसफाई हे किल्लेदार मावळी वेश घालून करतात. गडावर कोणत्याही प्रकारचा कचरा, दारूच्या बाटल्या, दगडावर नाव कोरलेले दिसत नसले नाही. परंतु रात्री-अपरात्री पर्यटक येऊन अन्न शिजवतात, कचरा करतात.किल्ले कैलासगड  :  गड किल्ले सेवा समितीबरोबरच मुळशीतील स्वराज प्रतिष्ठान ही संस्था किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे कार्य करते. हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर होता. किल्ल्यावर जाण्यासाठी वाटसुद्धा पर्यटकांना सापडत नव्हती. परंतु या संस्थेने वाटेवरची झाडेझुडपे तोडून दिशादर्शक फलक लावले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवार-रविवारी सर्व कार्यकर्ते दुर्गसंवर्धनाचे काम करतात. दरवर्षी दुर्गपूजन, शंकराच्या पिंडीला अभिषेक करून गडावर नवीन कार्याचा प्रारंभ करतात.किल्ले कोराईगड :  तालुक्यातील सर्वांत उंचीचे ठिकाण व अ‍ॅम्बी व्हॅली सिटीशेजारीच हा किल्ला आहे. गडावर मंदिरात मुक्कामाची व्यवस्था असल्याने पुणे, लोणावळा, मुंबईहून अनेक पर्यटक शनिवार-रविवारी या किल्ल्यावर राहायला येतात. किल्ल्यावर बऱ्याचदा अनेक ठिकाणी कचरा, दारूच्या बाटल्यांचा खच या किल्ल्यावर पाहायला मिळतो. जनावरे किल्ल्यावर मृत झाली असता त्यांच्या पोटात प्लास्टिकचा गोळा तयार झाल्याचे दिसून आले. किल्ल्यावर फिरायला आलेल्या अनेक तरुण-तरुणींनी दगडावर स्वत:ची नावे कोरल्याचा प्रकार दिसतो. कित्येकदा तालुक्यातील शिवभक्त जाऊन किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवतात.मुळशीतील किल्ले हे पूर्णपणे दुर्लक्षित आणि असुरक्षित असून किल्ले संवर्धनाचे काम काही मंडळे व संस्था करत आहेत. सरकारने किल्ल्यावर कसल्याही प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. ज्या किल्ल्यांसाठी महाराजांनी जिवाचे रान केले, त्याच किल्ल्यांकडे सरकार व प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करत आहे. - सचिन पळसकर, संस्थापक/अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान, मुळशीसरकारकडून गडकिल्ल्यांसाठी निधी येतो; परंतु त्याचा वापर योग्य रीतीने होत नाही. गडावर काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांना हे काम दिल्यास योग्य प्रकारे काम होऊन किल्ल्यावरील पर्यटन वाढण्यास हातभार वाढेल.-सागर शिंदे, श्री शिवदुर्ग संवर्धन, पिरंगुट