.........
मुस्लिम तरुणाशी विवाह केलेल्या हिंदू तरुणीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, “आमच्या लग्नाला १२ वर्षे झाली. मी मुस्लिम कुटुंबात आले पण मला कधीही कुणी त्रास दिलेला नाही. मी मांसाहार करत नाही, त्यासाठी माझ्यावर कोणी सक्ती केली नाही. उलट लग्नावेळी माझे शिक्षण बारावीपर्यंतच झाले होते. लग्नानंतर मी शिकले. आज मी नोकरीसुद्धा करते. मुस्लिम कुटुंब असले तरी वातावरण खूप मोकळे आहे. विशेष म्हणजे माझ्या नणंदेने हिंदू कुटुंबात लग्न केले आहे. तिचा संसारही छान सुरू आहे.”
........