शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अपहरणकर्त्यांना अटक

By admin | Updated: September 8, 2014 04:13 IST

येथील सूरज कदम (वय १५) या बालकाला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस नाईक केशव जगताप यांनी दिली.

पाटस : वरवंड (ता. दौंड) येथील सूरज कदम (वय १५) या बालकाला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस नाईक केशव जगताप यांनी दिली. कुरकुंभ येथील युवक राहुल भोसले, वरवंड येथील युवक दीपक दिवेकर यांच्या सर्तकतेमुळे अपहरण केलेल्या बालकाला जीवदान मिळाले; अन्यथा आरोपींनी या बालकाचे बरेवाईट केले असते. याप्रकरणी लखन विलास देशमुख (रा. कुरकुंभ, ता. दौंड), अविनाश संजय शिंदे (रा. यवत, ता. दौंड), अक्षय संजय राऊत (रा. सोलापूर) या तिघांना अटक करण्यात आली. शनिवारी (दि. ६) सायंकाळच्या सुमारास वरवंड गावच्या परिसरातून सूरज कदम हा बालक सायकलवरून येत असताना वरील तिन्ही आरोपींनी त्यांच्या जवळील ट्रक थांबविला आणि सूरजला म्हणाले, ‘तू आमची माहिती पोलिसांना पुरवतो,’ असे सांगून त्याला बेदम मारहाण करून त्याला चाकूचा धाक दाखवून ट्रक मध्ये (क्र. एमएच १२, एक्यू ६२२0) मध्ये टाकले आणि त्याचे अपहरण केले. ज्या वेळेस या बालकाला आरोपी मारत होते. त्या वेळेस काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यानुसार ग्रामस्थांनी त्याच्या घरी सदरची घटना कळवली. कुटुंबातील मंडळींनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सोलापूरपर्यंत नाकेबंदी केली. तसेच पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, फौजदार किनगी, फौजदार सुभाष कांबळे, पोलीस हवलदार रूपेश नावडकर यांनी पोलीस व्हॅनमधून आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली असता, रात्री आरोपींना ट्रकसह कुरकुंभ येथील आनंद गार्डन ढाब्याच्या परिसरात ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने अटक करून अपहरण केलेल्या बालकाला सुखरूप त्याच्या घरी पोहोच केले. (वार्ताहर)