शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षितांना भरती प्रक्रियेतून डावलले; जिल्हा न्यायालयात ९ हजार पदांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:57 IST

राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये ९ हजार पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात पात्रताधारक असलेल्या प्रत्येक उमेदवाराला परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही.

पुणे : राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये ९ हजार पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात पात्रताधारक असलेल्या प्रत्येक उमेदवाराला परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही. प्रत्येक जिल्हा न्यायालयाने परीक्षा घेण्यापूर्वीच शॉर्टलिस्ट तयार करून ३ लाख उमेदवारांना वगळले आहे. ही लिस्ट तयार करताना उच्च शिक्षित उमेदवारांना डावलून कमी शिक्षित असलेल्यांना प्राधान्य देण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. याविरोधात उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार केली आहे.राज्यातील जिल्हा न्यायालयामध्ये अनेक वर्षे क्लार्क, शिपाई आदी पदांची भरती झालेली नाही, त्यामुळे हजारो पदे रिक्त आहेत. यापार्श्वभूमीवर २८ मार्च २०१८ रोजी जिल्हा न्यायालयांमधील ८ हजार ९२१ रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली.त्यानुसार राज्यभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो बेरोजगार तरूणांनी क्लार्क, शिपाई पदांसाठी अर्ज केले. त्यातील अनेक उमेदवार हे व्दिपदवीधर आहेत. न्यायालयातील जागांची संख्या मोठी असल्याने आपल्याला नोकरी मिळेल, अशी आशा बाळगून त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती.मात्र, न्यायालयाने शॉर्ट लिस्टच्या नावाखाली अनेक उमेदवारांना वगळून टाकल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.वस्तूत: कोणत्याही पदाची भरती प्रक्रिया राबविताना त्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक उमेदवाराला परीक्षा देण्याची संधी दिली जाते. न्यायालयाने मात्र परीक्षेपूर्वीच उमेदवारांची शॉर्ट लिस्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही लिस्ट करताना कोणते निकष लावले याची कोणतीही माहिती उमेदवारांना देण्यात आलेली नाही.अनेक जिल्हा न्यायालयांमध्ये उच्च शिक्षित उमेदवारांऐवजी कमी शिक्षितांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. काही उमेदवारांची नावे एकाच वेळी दोन जिल्ह्यातील यादीमध्ये दिसून येत आहेत.आता दाद कुठे मागायची?एखाद्या भरती प्रक्रियेबाबत गोंधळ निर्माण झाला तर उमेदवारांकडे न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे पर्याय असतात. मात्र इथे न्यायालयाच्या भरती प्रक्रियेबाबतच प्रश्नचिन्ह असल्याने आता कुठे दाद मागायची असा प्रश्न उमेदवारांसमोर उभा टाकला आहे. जिल्हा न्यायालयातील क्लार्क, शिपाई आदी पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी देण्याची मागणी वगळण्यात आलेल्या उमेदवारांनी मुबंई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :jobनोकरी