शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘हेरिटेज टुरिझम’ला चालना मिळावी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:19 IST

पुणे : फणीआळी तालीम, नाना वाडा, बेलबाग विष्णू मंदिर, बुरूडआळी, तांबटआळी यासारखी अनेक वारसा स्थळे आजही शहराच्या पर्यटनाच्या नकाशावर धूसरच आहेत

पुणे : फणीआळी तालीम, नाना वाडा, बेलबाग विष्णू मंदिर, बुरूडआळी, तांबटआळी यासारखी अनेक वारसा स्थळे आजही शहराच्या पर्यटनाच्या नकाशावर धूसरच आहेत. शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, सारसाबग, सिंहगड, पर्वती, आगाखान पॅलेससारख्या वास्तूंप्रमाणे या दुर्लक्षित वारसा स्थळांकडे लक्ष दिले व ती विकसित केली तर पुणे शहरात भविष्यात हेरिटेज टुरिझमला चांगली चालना मिळू शकते.भारतात १९ ते २५ नोव्हेंबर हा ‘जागतिक वारसा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. नागरिकांमध्ये देशातील प्राचीन वारशाबद्दल जागृती निर्माण करणे व भावी पिढ्यांना आपल्या सांस्कृतिक ठेव्याविषयी आस्था निर्माण करण्याच्या प्रमुख उद्देशाने हा सप्ताह साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, पुणे शहरातील वारसा स्थळांची माहिती घेतली असता शहरात अनेक वारसा स्थळे आजही दुर्लक्षित असल्याचे निदर्शनास आले. सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर याचबरोबर आयटी सिटी म्हणून पुण्याची ओळख जागतिक पातळीवर पोहोचली आहे. वैद्यकीय पर्यटन म्हणून शहराची नवी ओळख निर्माण होत आहे. यामुळे शहरामध्ये दर वर्षी जगभरातील नागरिक विविध कारणांसाठी भेट देतात.शहरात असलेली पातळेश्वर मंंदिर, आेंकारेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, कसबा गणपती मंदिर याचबरोबर शिंदे छत्री, कौन्सिल हॉल, डेक्कन महाविद्यालय, जयकर बंगला यासारख्या वास्तू पर्यटकांना आकर्षिक करू शकतात.महापालिकेच्या हेरिटेज सेलमार्फत शहरातील काही वास्तूंचा विकास करण्याचे काम सुरू आहे; परंतु अद्याप शहरातील पर्याटनाच्या नकाशावर नसलेल्या वारसा वास्तूंची यादी करून त्याबाबत जनजागृती करणे, शहरात विविध ठिकाणी माहिती फलक लावणे, संकेतस्थळावर माहिती देणे आदी अनेक उपक्रम राबविण्याची गरज आहे. पुणे शहराला जगाच्या नकाशावर ‘हेरिटेज शहर’ म्हणून नवी ओळख निर्माण हाईल, असा आशावाद महापालिकेच्या वारसा विभागाचे निवृत्त अधिकारी श्याम ढवळे यांनी व्यक्त केला.शहरात येणाºया पर्यटकांना सध्या शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, सारसाबग, सिंहगड, पर्वती अशी मोजकीच ठिकाणे माहिती आहेत. परंतु, शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली अनेक ठिकाणे आजही दुर्लक्षित आहेत. सस्किंृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहर आणि परिसरात अनेक हेरिटेज वास्तू आहेत. शहरातील या वारसा स्थळांचा शहराच्या हेरिटेज टुरिझमसाठी चांगला उपयोग करून घेता येईल.>हेरिटेज शहरासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावापुण्याची जगाच्या नकाशावर हेरिटेज शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी विविध संस्था, व्यक्ती यांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहरामध्ये डेक्कन कॉलेज, भांडारकर संस्था, भारत इतिहास संशोधन संस्थेसारख्या अनेक संस्था, व्यक्तींचे प्राचीन संशोधनात मोठे योगदान आहे. त्यामुळे सांस्कृतिक, विद्येचे माहेरघर व आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्याची हेरिटेज शहर म्हणूनदेखील ओळख निर्माण होईल. हेरिटेज वारसाचा विकास केल्यास शहराचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास होण्यास मदत होईल- श्याम ढवळे, निवृत्त अधिकारी, महापालिका वारसा विभाग

टॅग्स :tourismपर्यटनPuneपुणे