शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे ४० टक्के पुणेकर त्रस्त; अ‍ॅनेमियाबाबत भारताचे स्थान तळाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:28 IST

पुणेकरांमध्ये १० पैकी ४ जणांना अनियमित हिमोग्लोबीनचा त्रास असल्याचे नुकत्याच झालेल्या आरोग्य सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे.

ठळक मुद्दे० ते ८० वयोगटातील २०१३ ते २०१७ या ५ वर्षांच्या काळात ६,५९,३५३ तपासण्यात आले नमुनेलोहयुक्त आणि जीवनसत्त्वांचा समावेश असलेले अन्न आवश्यक : डॉ. सुशील शहा

पुणे : सकस आहाराची कमतरता, धकाधकीचे जीवन, आरोग्य समस्यांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे हिमोग्लोबीनच्या कमतरतेचा सामना अनेकांना करावा लागतो. शरीरातील लोह कमी झाले, की हिमोग्लोबीनची कमतरता जाणवते. त्यामुळे थकवा येणे, भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. पुणेकरांमध्ये १० पैकी ४ जणांना अनियमित हिमोग्लोबीनचा त्रास असल्याचे नुकत्याच झालेल्या आरोग्य सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे.आरोग्य सर्वेक्षणामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळेत ० ते ८० वयोगटातील लोकांचे २०१३ ते २०१७ या ५ वर्षांच्या काळात ६,५९,३५३ नमुने तपासण्यात आले. यापैकी ३९ टक्के नमुन्यांमध्ये हिमोग्लोबीनची पातळी अनियमित दिसून आली. ३०-४० वर्षे वयोगटात हिमोग्लोबीनची अनियमित पातळी सर्वांत जास्त म्हणजे १७ टक्क्यांपेक्षा जास्त दिसून आली. २०-३० वर्षे वयोगटात यानंतर ही पातळी १४ टक्क्क्यांहून अधिक दिसून आली. ०-१० वर्षे वयोगटातील २८,८१३ नमुने तपासण्यात आले. यातील ६५ टक्के नमुने अनियमित असल्याचे दिसून आले, अशी माहिती पुण्यातील एका पॅथॉलॉजी लॅबने केलेल्या अभ्यासात पुढे आली आहे. जागतिक पोषणमूल्य अहवालात २०१७मध्ये अ‍ॅनेमियाबाबत भारताचे स्थान तळाशी दाखवण्यात आले आहे. 

हिमोग्लोबीनची पातळी वाढविण्यासाठी लाल पेशींचे घटलेले उत्पादन, रक्तपेशीच्या नाशात झालेली वाढ आणि रक्त कमी होणे आदी निकषांचा अभ्यास केला जातो. कमी हिमोग्लोबीनच्या पातळीला अनुसरून ते वाढविण्यासाठी कोणती पद्धत वापरावी, हे ठरवले जाते. लाल पेशी संक्रमित करणे, इरिथ्रोप्रोटीन प्राप्त करणे, सप्लिमेंट्स घेणे, लोहयुक्त आणि जीवनसत्त्वांचा समावेश असलेले अन्न हिमोग्लोबीनची पातळी राखण्यासाठी आवश्यक आहे. - डॉ. सुशील शहा

अ‍ॅनेमियाचा शोध घेण्यासाठी महिलांनी रक्ताची नियमित चाचणी करणे आणि योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. गर्भधारणा होण्याच्या वयात अ‍ॅनेमियाचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात, असे डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

सर्वेक्षण
वयोगटअनियमितसामान्यएकूण
०-१०१८,८६२९९५१२८८१३
१०-२०१३,४५०३८,९१०        ५२,३६०
२०-३०३६,२४९        ८४,३३५१,२०,५८४
३०-४०४४,२६१        ८५,९१६      १,३०,१७७
४०-५०३१,७३४      ५८,२४१८९,९७५
५०-६०३०,३५२        ५१,९९४        ८२,३४६
६०-७०४२,८७४      ४५,७७३      ८८,६४७
७०-८० २९,५४५        २०,५२३        ५०,०६८
८० आणि वर११,१६१        ५२२२      १६,३८३
एकूण२,५८,४८८   ४,००,८६५    ६,५९,३५३
टॅग्स :Puneपुणे