शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हवेलीच्या सभापतिपदी हेमलता काळोखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 02:59 IST

हवेलीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्याने बंडखोरी करीत भाजपा-शिवसेनेच्या मदतीने पक्षाला आव्हान दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर मिळाला.

कदमवाकवस्ती - हवेलीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्याने बंडखोरी करीत भाजपा-शिवसेनेच्या मदतीने पक्षाला आव्हान दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर मिळाला. या राजकीय घडामोडींमुळे रोमहर्षक ठरलेल्या हवेली पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार हेमलता कांतिलाल काळोखे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार कावेरी विलास कुंजीर यांचा चिठ्ठीने पराभव करीत सभापतिपदी विराजमान झाल्या आहेत.हवेली पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (दि.१४) येथील सभागृहात पार पडली. हवेली उपविभागीय महसूल अधिकारी ज्योती कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. हवेली पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून हेमलता कांतिलाल काळोखे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, अनपेक्षितपणे सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या सदस्या कावेरी विलास कुंजीर यांनी बंडखोरी करीत सभापतिपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला; तसेच भाजपाकडून सभापतिपदासाठी अश्विनी किशोर पोकळे यांनी, तर शिवसेनेकडून ललिता अनिल कुटे यांनी अर्ज दाखल केले होते; परंतु निर्धारित वेळेत ललिता कुटे यांनी अर्ज माघारी घेतल्याने सभापतिपदासाठी हेमलता काळोखे, कावेरी कुंजीर व अश्विनी पोकळे यांचे अर्ज कायम राहून निवडणूक झाली. निवडणुकीपूर्वी सभापतिपदासाठी निर्णायक युती झालेल्या भाजपा -शिवसेनेने राष्ट्रवादी बंडखोर कावेरी कुंजीर यांना पाठिंबा देऊन चाल खेळली. सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत आवाजी मतदानाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हेमलता काळोखे यांना १०, तर बंडखोर कावेरी कुंजीर यांना १० मते मिळाली, तर भाजपाच्या अश्विनी पोकळे यांना शून्य मते मिळाली. हेमलता काळोखे व कावेरी कुंजीर प्रत्येकी समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे सभापती निवडण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांनी घेतला. या निर्णायक कौलात हेमलता कोळोखे यांना नशीबाने साथ दिल्याने त्यांची सभापतिपदी निवडीची अधिकृत घोषणा झाली.राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा जल्लोषचिठ्ठी विरोधात गेल्याने भाजपा - सेनेला बंडखोराला पाठिंबा देऊन पंचायत समितीची सत्ता स्थापन करण्यावर पाणी फिरले आहे. सभापतिपदाची निर्णायक चिठ्ठीने साथ दिल्याने राष्ट्रवादीला आपली पत टिकविण्यात यश आले आहे. अचानक घडलेल्या निर्णायक कलाटणींनी निकालाची प्रचंड उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती. नूतन सभापती हेमलता काळोखे या देहू गणातून निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यादींनी हेमलता काळोखे यांचा सत्कार केला.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या