शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निराधार माता मदतीसाठी करतेय जॉन अब्राहमचा धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:13 IST

उदरनिर्वाहासाठी मदत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाकडे बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने पाठ फिरविल्याचा आरोप एका निराधार ज्येष्ठ नागरिक महिलेने केला आहे.

पुणे : मुलाच्या अपघाताला कारणीभूत ठरल्यानंतर उपचारासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी मदत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाकडे बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने पाठ फिरविल्याचा आरोप एका निराधार ज्येष्ठ नागरिक महिलेने केला आहे. मदत करतो असे सांगत केस मागे घेण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्ष-या घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे.शारदा दत्तू कसबे (वय ७०, रा. शांताईनगर, चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे त्यांचे नाव आहे. त्या पती व दोन मुलांसह मुंबईतील सांताक्रुझ झोपडपट्टीमध्ये राहण्यास होत्या. मुलगा शाम वाईन शॉपमध्ये कामाला होता. शाम आणि त्याचा मित्र तन्मय सायकलवरुन घराकडे येत असताना जॉन अब्राहम चालवित असलेल्या दुचाकीची त्यांना धडक बसली. या अपघातात शाम, तन्मय आणि स्वत: जॉन जखमी झाला होता. शाम आणि तन्मयवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. शामचा मार्च २००९ मध्ये मृत्यू झाला. काही दिवसांनी त्या पुण्यामध्ये राहण्यास आल्या. शाम मयत असल्याने शारदा यांना उच्च न्यायालयामध्ये सुनावनीसाठी बोलावण्यात आले. जॉनने मोटार केस मागे घेण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षºया घेतल्या. स्वत:चे छायाचित्र देऊन त्याच्या पाठीमागे मोबाईल क्रमांक देऊन मदत लागल्यास फोन करा, असे सांगितले. पुण्याला घरी सोडले. त्यानंतर फोन केला, तेव्हा समोरच्याने फोन बंद केला. हा क्रमांक आजवर बंदच आहे, असे शारदा यांनी सांगितले.>पुण्यात शारदा यांनी मोलमजुरी करुन उदरनिर्वाह केला. सध्या वार्धक्यामुळे त्यांना काम होत नाही. त्यांच्यासमोर जगायचे कसे? असा मोठा प्रश्न आहे.