शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार भोसलेंसह पत्नीचे ही संचालकपद काढले, सहकार आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:29 IST

आमदार अनिल भोसले आणि त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांच्यावर सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी शिवाजीराव भोसले बँकेच्या संचालकपदावरून काढून टाकण्याची कारवाई केली आहे.

पुणे : आमदार अनिल भोसले आणि त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांच्यावर सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी शिवाजीराव भोसले बँकेच्या संचालकपदावरून काढून टाकण्याची कारवाई केली आहे. स्वत: संचालक असलेल्या या बँकेला स्वत:चीच जागा भाड्याने देऊन सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाच वर्षांची मुदत पूर्ण होईपर्यंत त्यांना अन्य कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालकपदाची निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेशही झाडे यांनी दिले आहेत.महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या कलम ५७ नुसार संचालक म्हणून काम करताना संबंधित बँकेशी कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक संबंध ठेवता येत नाहीत. मात्र, भोसले यांनी त्यांच्या स्वत:च्याच, तसेच कंपनीच्या मालकीच्या इमारतीमध्ये बँकेला भाड्याने जागा दिली. विद्यानगर, कोथरुड, डेक्कन, विश्रांतवाडी आणि येथे तसेच बँकेच्या शिवाजीनगर मुख्यालयासाठी आपल्या जागा भाड्याने दिल्याचे आदेशात म्हटले आहे. याबाबत सुधीर रामचंद्र आल्हाट (रा. शिवाजीनगर) यांनी सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार दिली होती. भोसले विधान परिषदेचे आमदार असून त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले या नगरसेविका आहेत. भोसले यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७८ (१) (ब) मधील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ५७ (१) अचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही सहकारी संस्थेत स्वीकृत सदस्यपदी किंवा नामनिर्देशित करण्यास अपात्र ठरविण्यासोबतच संचालकपदावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.>भोसले यांनी महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या कलम ५७ चे उल्लंघन केले आहे. या कायद्यानुसार संचालक असलेल्या व्यक्तीला संबंधित बँकेसोबत व्यावसायिक संबंध ठेवता येत नाहीत. त्यांनी स्वत:च्या मालमत्ता बँकेला भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन झाल्याने कारवाई करण्यात आली आहे.- विजयकुमार झाडे, आयुक्त, सहकार