शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत सरकारी नियमांचा आधार घेत बढतीनंतर ४ हजारांनी वेतन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 18:12 IST

महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बढतीच्या बाबतीत अनेक वर्षे अन्याय होत आहे. आता तर सरकारी नियमांचा दाखला देत थेट वेतनावरच संक्रात आणली जात आहे.

ठळक मुद्दे४ अधिकाऱ्यांचे वेतन दरमहा तब्बल ४ हजार २०० रूपयांनी कमी वेतनकपात ग्रस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार केली असून संघटना त्याविरोधात दाद मागणार

राजू इनामदार   

पुणे: सरकारी नियमांमुळे असे कारण देत सध्या महापालिकेतील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा प्रकार सुरू आहे. सहायक आयुक्तपदावरून उपायुक्त पदावर बढती मिळाल्यानंतर ४ अधिकाऱ्यांचे वेतन दरमहा तब्बल ४ हजार २०० रूपयांनी कमी करण्यात आले आहे. महापालिका स्वायत्त संस्था असतानाही याची मुळे सरकारी नियमात असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत येत असलेल्या अधिकाऱ्यांना आयुक्त स्तरावरून विशेष विभाग देण्यात येतात. सामान्य प्रशासन हा त्यातीलच एक विभाग आहे. मात्र त्यामुळे मुळ महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बढतीच्या बाबतीत अनेक वर्षे अन्याय होत आहे. आता तर सरकारी नियमांचा दाखला देत थेट वेतनावरच संक्रात आणली जात आहे. महापालिका स्वायत्त संस्था असून तिला आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवण्याचा अधिकार असतानाही सरकारी नियमामुळे असे सांगत सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले जात आहे.गेली काही वर्षे उपायुक्त पदाच्या बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या ४ अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने विविध कारणे दाखवत प्रलंबित ठेवले. वसंत पाटील, उमेश माळी, संध्या गागरे व माधव देशपांडे या अधिकाऱ्यांची एप्रिल २०१८ मध्ये म्हणजे नुकतीच सहायक आयुक्त पदावरून उपायुक्त पदावर पदोन्नती करण्यात आली. त्यातील पाटील हे येत्या दोन महिन्यात निवृत्तच होत आहेत. संघ्या गागरे यांचे सेवेचे फक्त सात महिने शिल्लक राहिले आहेत. माळी व देशपांडे यांनाही निवृत्तीसाठी फक्त दोन ते तीन वर्षच आहेत. सलग तीन वर्षे हे सर्व अधिकारी बढतीच्या प्रतिक्षेत होते.निवृत्तीच्या ऊंबरठ्यावर त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर वास्तविक त्यांच्या वेतनात वाढ होणे अपेक्षित होते, प्रत्यक्षात मात्र त्यांचे वेतन ४ हजार २०० रूपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारी सेवेत उपायुक्त पदाला असलेली वेतनश्रेणीच महापालिकेतील उपायुक्त पदाला लागू केली असे कारण सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात येत आहे. या चार अधिकाऱ्यांशिवाय अन्य काही कर्मचाऱ्यांनाही याचप्रकारे वेतन कमी करण्याचा धाक घालण्यात आला आहे.महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी ठरवण्याचा अधिकार महापालिकेलाच आहे. तरीही सरकारच्या वेतनश्रेणीचा नियम महापालिकेवर लादण्यात येत आहे असे अधिकाऱ्यांचे मत आहे. याच नियमाचा आधार घेत सामान्य प्रशासन विभाग काही कर्मचाऱ्यांकडून त्यांनी सरकारी नियमापेक्षा जास्त वेतन घेतले आहे असे सांगत त्या जादा वेतनाची वसुली करणार असल्याचीही चर्चा महापालिकेत आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांची स्वतंत्र संघटना आहे. तसेच मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनाही आहे. या दोन्ही ठिकाणी वेतनकपात ग्रस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार केली असून संघटना त्याविरोधात दाद मागणार असल्याचे समजते. 

टॅग्स :Puneपुणे