शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सासवड नगर परिषदेच्या कचरा संकलनकार्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:45 IST

दहा घंटागाड्या, दोन ट्रॅक्टर उपलब्ध : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत साह्य

सासवड : वाढते शहरीकरण व लोकसंख्येमुळे सासवड नगर परिषद क्षेत्रामध्ये जमा होणारा कचरा एकत्रित करून विल्हेवाट लावणारी यंत्रणा अपुरी पडत होती. त्यानुसार तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सासवड नगर परिषदेला १० घंटागाड्या व २ ट्रॅक्टर मंजूर झाले असून, यापैकी ४ घंटागाड्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले.

सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी याबाबत राज्य शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार ही वाहने पुरविण्यात आल्याचे भोंडे यांनी सांगितले. सासवड शहराला १० घंटागाड्या व २ ट्रॅक्टर मंजूर झाले असून, यापैकी ४ घंटागाड्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले. याप्रसंगी सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक, जनमत विकास आघाडीचे प्रमुख संजय जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, सुहास लांडगे, संदीप जगताप, अजित जगताप, यशवंत जगताप, पुष्पाकाकी जगताप, मंगलनानी म्हेत्रे आदी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. सासवड शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यापूर्वी एकूण ८ वाहने होती. वाहनांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे व सासवड नगर परिषदेने केलेल्या मागणीनुसार आताकचरा वाहतूक गाड्यांची संख्या २० झाल्यामुळे प्रत्येक वॉर्डनिहाय कचरा संकलनासाठी गाड्या उपलब्ध होणार आहेत. अधिकाअधिककचरा संकलनासाठी त्याचा उपयोग होणार आहे.कचरा संकलन करणाºया एका गाडीची क्षमता एका फेरीमध्ये ५०० किलोपर्यंत होती. एकूण ८ वाहनांमुळे दिवसभरात १० ते १२ टनापर्यंत कचरासंकलन होत होते. ते आता वाढून १२ ते २० टनांपर्यंत जाणार आहे. गाड्यांची संख्या कमी असल्याने नागरिक कचरा कोठेही टाकत होते. गाडी वेळेवर न आल्याने या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करता येत नव्हती. आता गाड्यांची संख्या वाढल्याने व कचरा वाहतूक वेळेवर होत असल्याने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. - विनोद जळक, मुख्याधिकारीघरगुती कचºयाचे खत तयार करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सासवड नगर परिषदेने सहारा सिल्वर या सोसायटीची निवड केली आहे. सोसायटीत एकूण ७५ ठिकाणी ‘होम कंपोस्ट बास्केट’ व ‘कंपोस्ट कल्चर’ देण्यात येणार आहे. साधारणत: २१ दिवसांनी हे खत तयार होणार असून, याचा वापर याच सोसायटीत झाडांसाठी करण्यात येणार आहे.- मार्तंड भोंडे, नगराध्यक्ष, सासवड

टॅग्स :Puneपुणे