शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निमसाखर रस्त्यावरील खड्डे बुजवले, प्रवास होणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 02:30 IST

प्रवास होणार सुखकर : नागरिकांनी केली होती मागणी

निमसाखर : निमसाखर ते चौपन्न फाटा या रस्त्यावर नुकतेच डांबर टाकुन खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. अवैध सायपन साठी खोदल्यामुळे अनेक ठिकाणी उखडलेला, खचलेला अशी या रस्त्याची अवस्था होती. मात्र नुकतेच सार्वजनिक बांधकाम खात्याने पडलेले खड्डे बुजवल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

बारामती- निरा नरसिंहपूर या राज्य मार्गावर निमसाखर हे सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या गाव आहे. मोठी लोकसंख्या असलेले आणि नीरा नदी काठी वसलेले हे गाव आहे. निमसाखर पासून ५४ फाटा हा रस्ता सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. यापैकी सर्वसाधारण पाच किलोमीटरचा रस्ता बऱ्यापैकी स्थितीत आहे. तर उरलेला रस्ता चौपण फाट्यापासून निमसाखर दिशेला सर्वसाधारण दीड ते दोन किलोमीटर रस्ता पूर्णपणे खचलेला रस्त्याची खडी उघडलेली बाजूला काटेरी झुडपे आणि पाईपलाईनसाठी खोदलेल्या चाºया अशी अवस्था या रस्त्याची आहे. या रस्त्यावरून उसाची वाहतूक होत असते. दूध संघाचे अनेक टँकर व दूध संकलन करणारी अनेक वाहने या रस्त्याचा वापर करून जात असतात. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याने कळवले होते. मात्र याकडे संबंधित खात्याच्या अधिकाºयांकडून दुर्लक्ष होत होते नंतरच्या काळामध्ये लोकांच्या तक्रारी वाढल्या. यामुळे या रस्त्यावर डागडुजी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले. या रस्त्याचा वापर करुन प्रवास करणाºया प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.भोलावडे ते महुडे रस्त्याची दयनीय अवस्थामहुडे : खोºयात जाणारा एकमेव भोलावडे ते महुडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा,अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. भोलावडेपासून महुडेला जाणाºया या १० किमी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावर प्रचंड मोठ्ठे खड्डे तयार झाल्याने समोरून येणाºया वाहनाला कोणत्या बाजूने जावे हे समजत नाही. साइडपट्ट्या पूर्ण पणे खचलेल्या आहेत त्यामुळे रस्त्यावरून वाहन खाली उतरवण्यासाठी वाहन चालकांना प्रश्न पडला आहे. या भागातील शेतकºयांचे मुख्यपीक भातशेती व दुग्ध व्यवसाय होय. दुग्ध व्यवसाय करणारे शेतकºयांना शहरात दूध घेवून येण्यासाठी खड्डामुळे गाडी चालवणे अवघड होत असल्याचे दुग्ध व्यवसायिक ज्ञानेश्वर दुधाणे (नांद) ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. या भागातील नागरिकांची , दुग्धव्यवसायकांची, वाहनचालक रस्ता दुरुस्तीची मागणी करीत आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPuneपुणे