शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

By admin | Updated: June 10, 2017 02:00 IST

पुणे जिल्ह्यात लोणावळा, मावळ, दौंड तालुक्यात पावसाने आज दमदार हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे जिल्ह्यात लोणावळा, मावळ, दौंड तालुक्यात पावसाने आज दमदार हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कुरकुंभ (ता. दौंड) परिसरात शुक्रवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. लोणावळा शहर व परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची रिपरिप सुरू होती. मावळ तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.काही दिवसांपासून लोणावळा परिसरात सायंकाळच्या सुमारास आभाळात ढग दाटून पावसाचा शिडकाव होत होता. शुक्रवारी सकाळपासूनच लोणावळ्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काळ्या ढगांची हवेत दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली. लोणावळा शहरासह परिसरातील वाकसई, वरसोली, कुसगाव, डोंगरगाव, औंढे, औंढोली, देवघर, कार्ला, पाटण, मळवली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे, टाकवे या सर्व गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. भातरोपांची पेरणी झाली असल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत असताना झालेले मॉन्सूनचे आगमन हे सुखकारक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.यवत परिसरात आज (दि. ९) दुपारच्या सुमारास वरुणराजाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. दुपारच्या सुमारास पावसाच्या मध्यम सरी पडल्या, यामुळे मॉन्सूनचे आगमन झाल्याची चाहूल लागली आहे. आज यवतच्या आठवडेबाजारात सकाळपासूनच चांगली रेलचेल असल्याचे दिसत होते. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मागील शुक्रवारी आठवडेबाजार पूर्णपणे बंद होता. मात्र आज सकाळपासून बाजार चांगला भरला होता.दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने बाजारकरू मंडळींची चांगलीच धांदल उडाली. प्रचंड उकाड्यानंतर पावसाने वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण केला होता. पावसाचे वेळेत आगमन झाल्याने सर्वांनाच आजचा पाऊस हवाहवासा वाटला.