शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या पाणी वापरावर उद्या सुनावणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 03:46 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने धरण प्रकल्पातून नियमानुसार पाणी घेणे बंधनकारक आहे.

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने धरण प्रकल्पातून नियमानुसार पाणी घेणे बंधनकारक आहे. मात्र, पालिकेकडून अधिकचे पाणी वापरले जात असल्यामुळे पालिकेच्या अधिकच्या पाणी वापराबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, गुरुवारी (दि. १४) या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर पालिकेच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आले, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. त्यातच पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पालिका प्रशासनाला पाणी द्यावे लागणार आहे. मात्र, पालिका आणि जलसंपदा विभागाचा सहा वर्षांपूर्वी झालेला करार २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे. नवीन करार करण्यास जलसंपदा विभागाने पालिकेला सहा महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत पालिकेकडून लोकसंख्येची माहिती जमा केली जाणार आहे. परंतु, सहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या करारानुसार पाणी न घेता पालिकेकडून अधिकचे पाणी वापरले जात आहे. त्यामुळे यंदा ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी सोडले जाणार नाही. केवळ उन्हाळ्यात काही गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे. ग्रामीण भागाच्या वाट्याचे पाणी पालिकेकडून वापरले जात असून पालिकेच्या पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासंदर्भातील याचिका दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पालिकेच्या पाणी वापरावर निर्बंध घातले गेले तर पुणेकरांवर पाणी कपातीची कुºहाड कोसळू शकते. त्यातच खडकवासला धरण प्रकल्पात मंगळवारी (दि. १२) केवळ १०.९३ टीएमसी साठा शिल्लक होता. तसेच पंधरा दिवसांत एक टीएमसी एवढा पाणीसाठा कमी होत आहे. याच गतीने पाणीसाठा कमी झाला तर उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करणे अवघड जाईल.जलसंपदा विभागाकडून १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन न झाल्यास खडकवासला धरण प्रकल्पात १५ जुलैपर्यंत सर्वसाधारणपणे १.५ ते २ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक राहील, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. उन्हाळ्यात उपलब्ध पाणीसाठाच्या सुमारे एक ते दीड टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा वापर नियोजनबद्धरीत्या करण्याची गरज असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका