शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी, सरकार पक्षाने मागितला वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:47 IST

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज केला आहे. 

पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज केला आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती यांना गेल्या गुरुवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे़ या वेळी त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता़या अर्जाची विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांच्यासमोर सुनावणी झाली़ सरकार पक्षाने जामीन अर्जावर आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती केली़ त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १३ मार्च रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले़याशिवाय, डीएसके यांची ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विकण्यास परवानगी मिळावी़ ती ४२ लाख स्क्वेअर मीटर जागा असून त्यात जमीन, इमारतींचा समावेश आहे़ त्याच्या विक्रीतून आलेले पैसेआम्ही न्यायालयात जमाकरतो़ त्यातून सध्या ठेवीदारांची २३२ कोटी रुपयांची थकबाकी आहे़, ती एकरकमी देता येईल, अशी विनंती गुरुवारी न्यायालयाला केली असल्याचे अ‍ॅड़ चिन्मय इनामदार यांनी सांगितले़या अर्जावरही १३ मार्चला सुनावणी होईल.1 ठाणे येथील एका मालमत्तेच्या प्रकरणात डी़ एस़ कुलकर्णी यांना ६ कोटी ५५ लाख रुपये मिळणार आहेत़ ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी हे पैसे मिळावेत, असा अर्ज डी़ एस़ कुलकर्णी यांचे वकील चिन्मय इनामदार यांनी सोमवारी न्यायालयात केला़2 यावर आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस अधिकारी नीलेश मोरे यांनी मुंबई पोलिसांना ही रक्कम हवी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़ त्यावर येथील न्यायालयात आम्ही प्रथम अर्ज केला आहे़; त्यामुळे ही रक्कम पुण्यातील ठेवीदारांना मिळावी, असे म्हणणे डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी मांडले़ 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालय