शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थांना येणार आरोग्यदायी स्वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 18:51 IST

प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत सजग असल्याने अधिकाधिक नैसर्गिक पद्धतीच्या खाद्यपदार्थांचा वापर करताना दिसत आहे.

ठळक मुद्देजिवोदॉनचा प्रकल्प रांजणगाव येथे सुरु : पेय, स्नॅक्स खाता येणार मोकळेपणानेअगदी भेळीसारखा प्रकार घेतल्यास, त्याचा स्वाद, रंग आणि सुगंध ग्राहकांना आकर्षित करणारा मसाले आणि इतर नैसर्गिक पदार्थ असे ५० टक्के कच्चा माल स्थानिक बाजारपेठेतून खरेदी देशात पारंपारिक नाश्त्याऐवजी कुकीज आणि बेकरी पदार्थांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विकसित

पुणे : प्रत्येक व्यक्ती आता आपल्या आहाराबद्दल जागरुक झाला आहे. त्यामुळे आहार घेत असलेल्या आहारात किती कॅलरी आहेत, हे तो पाहात आहे. कारण त्याला सडपातळ आणि निरोगी शरीर हवे आहे. याचे भान ठेऊन कमी साखर, फॅट कमी असलेले पदार्थ त्याची चव कायम ठेवत बनविण्याची पद्धत कंपनीने विकसित केली आहे. त्यामुळे प्रत्यक खाद्यपदार्थ आरोग्यदायी आणि सकस बनविण्याकडे कल असल्याची माहिती जिवोदॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिलस अँड्रीयर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. जिवोदॉनच्या फ्लेवर्स विभागाच्या आशिया- पॅसिफिक क्षेत्राच्या व्यावसायिक प्रमुख मोनिला कोठारी, लुई डिअमिको या वेळी उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी येथे तब्बल ४० हजार चौरसफुटांवर स्वाद आणि सुगंध क्षेत्रातील आघाडीच्या जिवोदॉनने प्रकल्प उभारला आहे. येथे कंपनीने ६० दशलक्ष स्विस फ्रँकची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून द्रवकचरा निर्माण होणार नाही. तसेच, सौरऊजेर्चा वापर येथे मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. अँड्रीयर म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत सजग असल्याने अधिकाधिक नैसर्गिक पद्धतीच्या खाद्यपदार्थांचा वापर करताना दिसत आहे. प्रसंगी बाजारातील किंमतीपेक्षा अधिक किंमत मोजायला देखील तो तयार आहे. विविध खाद्य उत्पादक कंपन्यांसाठी नैसर्गिक पदार्थांचा अधिक वापर असलेली, आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात येत आहे. आत्तापर्यंत खाद्यपर्दांचे ६० हजारांहून अधिक खाद्यपदार्थ बनविण्याच्या पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यासाठी आवश्यक मसाले आणि इतर नैसर्गिक पदार्थ असे ५० टक्के कच्चा माल स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केला जातो.  जिवोदॉनच्या फ्लेवर्स विभागाच्या आशिया-पॅसिफिक क्षेत्राच्या व्यावसायिक प्रमुख मोनिला कोठारी म्हणाल्या, देशात पारंपारिक नाश्त्याऐवजी कुकीज आणि बेकरी पदार्थांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. हे पदार्थ स्वादिष्ट असण्या बरोबरच आरोग्यदायी देखील कसे होतील, याकडे लक्ष देण्यात येत आहे. अगदी भेळीसारखा प्रकार घेतल्यास, त्याचा स्वाद, रंग आणि सुगंध ग्राहकांना आकर्षित करणारा असेल. त्यामुळे अगदी स्थानिक बाजारातील पदार्थ देखील देशी आणि जागतिक पातळीवर कसे पोहोचविता येईल, यावर आम्ही काम करु. 

टॅग्स :foodअन्न