तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अंबादास देवकर यांनी सांगितले.
चांदर येथील एका युवकाने आपल्या आईच्या इच्छेसाठी ३० किलोमीटर डोलीतून आपल्या आईला सुखरूप घरी
आणले. या परिसर अतिशय दुर्गम आणि डोंगरी असल्याने कोणत्याही प्रकारची दळणवळणाची सोय नसल्याने या
युवकास जीवघेणा प्रवास करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही या गावात अद्याप रस्ता पोहोचला नाही. त्यामुळे येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ‘लोकमत’मध्ये रस्ता नसल्याने आजारी आईला डोलीतून मुलाने केला ३० किलोमीटर प्रवास, अशी बातमी प्रसिद्ध होताच तालुका आरोग्य विभागातील एक पथक आज दि.१७ रोजी सकाळी ८.३० वाजता चांदर येथील बारकाबाई लक्ष्मण सांगळे (वय ६०) यांच्या घरी पोहोचले. आरोग्य पथकामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पासलीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमित भाहेकर,
आरोग्य सहायक खडसरे, फिरोज तांबोळी, आरोग्यसेविका आशा कचरे याचा समावेश होता. या पथकाने आजीची तपासणी केली व आजीला औषधोपचार केले. वेल्हे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पासली या केंद्रांर्तगत चांदर हे गाव येत असून भौगोलिकदृष्ट्या डोंगर द-या व रस्त्याची सोय नसल्याने आणि दळणवळणाची कोणतेही साधन या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. तसेच अंतरही जास्त असल्याने या भागात आरोग्य विभागाला सेवा देण्यास अडचणी निर्माण होत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अंबादास देवकर यांनी दिली.
जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे म्हणाले, की चांदर ते माणगाव येथील रस्त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर झाला आहे.
हे अंतर १२ किलोमीटर असून तीन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. वनविभागाच्या अडचणीमुळे उर्वरित रस्त्याचे काम करणे बाकी आहे.
चांदर (ता. वेल्हे) बारकाबाई सांगळे या आजीची तपासणी करताना पासली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमित भाहेकर व इतर.