शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Ashadhi Wari: आराेग्य विभागाकडून देहू, आळंदीत २२ हजार वारकऱ्यांवर उपचार

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: June 12, 2023 15:11 IST

पालखीमार्गावर ७५ रुग्णवाहिका...

पुणे : आराेग्य विभागाकडून वारक-यांवर उपचार करण्यात येत आहेत. दि. 6 जून ते १० व ११ जूनपर्यंत देहू व आळंदी या ठिकाणी वारक-यांसाठी औषधोपचार सोय म्हणून 10-10 बूथ निर्माण करण्यात आले. शासकीय संस्थेमधून व निर्माण कैलेल्या बूथ व मेडिकल टीम कडून आत्तापर्यंत आळंदीत 11 हजार 896 व देहूंमध्ये 10 हजार 894 वारकऱ्यांना औषधोपचार करण्यात आलेला आहे. तसेच एकूण 56 वारकऱ्यांना अॅडमिट करून उपचार केले व 14 वारकऱ्यांना संदर्भ सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत.

देहू व आळंदी येथे प्रस्थानाच्या आधीच एक आठवडा पूर्वीपासून आरोग्य विभागामार्फत आळंदी देवस्थान व देहू देवस्थान या ठिकाणी किटकशास्त्रीय धूर फवारणी कार्यक्रम व पाणी नमुने तपासणी करण्याकरीता अतिरिक्त विशेष मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका तैनात केलेल्या आहेत. दोन्ही देवस्थानच्या ठिकाणी एकूण 1 हजार 851 हॉटेल्स व त्यामधील 6 हजार 853 कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. विहिरी, धर्मशाळा, नळाचे पाणी, हॅन्ड पंप, घरातील पाणी अशा ठिकाणचे एकूण 8 हजार 155 पाणी नमुने तपासणी करण्यात आली. दूषित पाण्याचे प्रक्रिया करून दुपार टेस्टिंग करण्यात आली. दोन्ही पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत फिरती वैदयकीय आरोग्य पथके तैनात करण्यात आलेली आहेत.

पालखीमार्गावर ७५ रुग्णवाहिका

अत्यावश्यक सेवेसाठी 24 तास रुग्णवाहिका पालखी मार्गावर तसेच पालखीसोबत कार्यरत आहेत. शिवाय पालखी सोहळ्या दरम्यान 108 च्या एकूण 75 रुग्णवाहिका तैनात आहेत. प्रत्येकी दोन किलोमीटर वरती एक आरोग्य पथक असे एकूण 127 आरोग्य पथके तयार केलेले आहेत. दिंडी प्रमुखांना एक हजार औषधांचे किट देण्यात आलेले आहे. त्यांना 156 टँकरद्वारे पाणीपुरवठा नियोजन केलेले आहे.

जनजागृतीसाठी पथनाट्ये

आरोग्य विषयक जनजागृतीसाठी खास तीन पथनाट्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण पालखी मार्गावर आरोग्य विषयी माहितीसाठी खास तीन चित्ररथांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पंढरपूर येथे दिनांक २८ ते २९ जूनदरम्यान दोन दिवसांमध्ये महाआरोग्य शिबिराचे नियाजन केलेले आहे.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड