शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग! सेवेच्या दर्जात कमतरता,किरकोळ औषधांवरच भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 03:30 IST

महापालिकेचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) दिसायला चांगला; मात्र सेवेच्या दर्जात कमतरता, असा झाला आहे. गरीब वसाहतींमधील रुग्णांकडून ओपीडीला चांगला प्रतिसाद मिळतो;

राजू इनामदार पुणे : महापालिकेचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) दिसायला चांगला; मात्र सेवेच्या दर्जात कमतरता, असा झाला आहे. गरीब वसाहतींमधील रुग्णांकडून ओपीडीला चांगला प्रतिसाद मिळतो; पण त्यांच्यावर अपेक्षित उपचार केलेच जात नाहीत, अशी स्थिती आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा निकष दर ५० हजार लोकसंख्येमागे एक बाह्य रुग्ण विभाग, असा आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार पुण्याची लोकसंख्या ३५ लाख आहे. त्यानुसार एकूण ७० बाह्य रुग्ण विभाग असणे गरजेचे आहे. महापालिकेच्या ४७ ओपीडी आहेत. म्हणजे २३ कमी आहेत. नव्याने ओपीडी सुरू करण्याचा महापालिकेचा काहीही विचार नाही, कारण सध्या असलेल्या ओपीडीमध्येच नियुक्ती करण्यासाठी डॉक्टर नाहीत. डॉक्टरची तब्बल ५७ पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. सर्व ओपीडी महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये आहेत. इमारतींची अवस्था चांगली आहे. रंगरंगोटी वेळेवर होते. फर्निचर चांगले आहे. ४७ पैकी १७ ओपीडी या प्रसूतिगृहांशी म्हणजे मोठ्या रुग्णालयांशी निगडित आहे. त्यामुळे तिथे फारशी अडचण येत नाही. फक्त ओपीडी आहेत, तिथे मात्र चांगली अवस्था नाही. डॉक्टरची संख्या मुळातच अपुरी असल्यामुळे जादा डॉक्टर देणे प्रशासनाला शक्य होत नाही. ५७ डॉक्टरची पदे रिक्त, आरोग्य विभागातच एकूण ५२८ पदे रिक्त असतानाही त्याकडे प्रशासन किंवा पदाधिकारी गंभीरपणे पाहायला तयार नाहीत.आरोग्य आराखडा जाहीर करावाबांधकाम विभागात मध्यंतरी अभियंत्यांची तब्बल २०० पदे भरली गेली; आरोग्य विभागात मात्र गेली अनेक वर्षे ५२८ मंजूर असलेली पदे रिक्त असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. महापालिकेच्या वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. यासाठी आयुक्तांनी स्वत: यात लक्ष घालून आरोग्य आराखडा तयार करावा व त्याची अंमलबजावणी करावी.- विशाल तांबे, नगरसेवकसुधारणा गरजेचीमहापालिकेचा बाह्य रुग्ण विभाग हा शहरातील गरीब कुटुंबांचा फार मोठा आधार आहे. मात्र, त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. स्वतंत्र इमारत, डॉक्टर व अन्य कर्मचारी, औषधांचा नियमित पुरवठा एवढे सगळे असताना केवळ डॉक्टर नाही, कर्मचारी नाहीत म्हणून काही ओपीडी पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, औषधे उपलब्ध नाहीत, असे सांगितले जाते ते अयोग्य आहे.- महेश महाले, सामाजिक कार्यकर्ते