शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य पथक की मद्यपींचा अड्डा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 04:01 IST

जिल्हा परिषद अध्यक्षांची आरोग्य पथकाला अचानक भेट : असुविधांसह कचऱ्याचे साम्राज्य पडले दृष्टीस

दौंड : दौैंड येथील प्राथमिक आरोग्य पथकाच्या इमारतीला पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी अचानक भेट दिली. तेव्हा आरोग्य पथकाच्या परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या, घाणीचे साम्राज्य होते आणि कुठलेही अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच, आरोग्य पथकाच्या संरक्षक भिंतीच्या आत खासगी गाड्या उभ्या केल्या जातात. तेव्हा हे आरोग्य पथक आहे की खासगी वाहनतळ? याचा उलगडा होत नसल्याची नाराजी देवकाते यांनी व्यक्त केली.दरम्यान, रात्रीच्या वेळी या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे, तर आरोग्य पथकाच्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच, स्वच्छतागृह आणि नवीन प्रवेशद्वार बसविण्याकरिता २५ लाख रुपये मंजूर झालेले आहेत. परंतु, एकंदरीत परिस्थिती पाहता, २५ लाखांचा निधी कमी पडेल. तेव्हा वाढीव निधी देण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील, असे देवकाते यांनी सांगितले. जगदाळे चर्चा करताना म्हणाले, की सदरची वास्तू जुनी असून त्यावर पैसा खर्च केला, नव्याने आरोग्य पथकाची चांगली वास्तू शहरात उभी राहील.ंअद्याप सुरक्षारक्षकाची नेमणूक नाहीदौैंड आरोग्य पथकाचा परिसर स्वच्छ केलेला आहे; परंतु संरक्षक भिंत नादुरुस्त असल्याने त्यातच सुरक्षारक्षक नसल्यामुळे काही मद्यपी दारू पिऊन बाटल्या टाकून जातात. या परिसरात सुरक्षारक्षकाची मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे; मात्र अद्याप सुरक्षारक्षक मिळालेला नाही.- डॉ. अशोक रासगेठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खचदौंड आरोग्य पथकाच्या संरक्षक भिंतीच्या आत ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या. रात्री येथे सुरक्षारक्षक नसतो. तेव्हा शहरातील काही मद्यपींना दारू पिण्यासाठी आरोग्य पथकाच्या व्हरांड्यात सोयीस्कर आणि सुरक्षित जागा मिळते. हे मद्यपी दारू पिऊन बाटल्या तिथेच टाकून देत असल्यामुळे ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात.

टॅग्स :Healthआरोग्य