शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हेडिंग 1 - पंख से कुछ नही होता...हौसलों से ही उडान होती है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:11 IST

किंवा हेडिंग 2 - मंजिले भी जिद्दी है...लेकिन बुलंद है हौसले! प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रत्येक ...

किंवा

हेडिंग 2 - मंजिले भी जिद्दी है...लेकिन बुलंद है हौसले!

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रत्येक वेळी आपल्याला हवी ती गोष्ट मिळेलच असे नाही...सुविधा नाहीत, प्रशिक्षण नाही अशा तक्रारी करत राहण्यापेक्षा आपल्यातील कौशल्य धार देत ते तळपण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त महत्वाची...स्वतःवर अढळ विश्वास आणि पालकांचा पाठिंबा असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करता येते...''इसलीए हमारी लडकियों के हौसले बुलंद है''...रुबिया सैद अतिशय आत्मविश्वासाने बोलत होती!

असीम फाउंडेशन आणि व्हिक्टर फोर्सतर्फे आयोजित पुणे आणि काश्मीर या दोन संघांमधील क्रिकेट सामन्यासाठी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मुलींचा संघ शनिवारी पुण्यात दाखल झाला. त्यावेळी त्यांनी काश्मीरमधील क्रीडा क्षेत्राची परिस्थिती, क्रिकेटप्रती मुलींची समर्पण वृत्ती, पालकांचा पाठिंबा अशा विविध विषयांवर 'लोकमत'' प्रतिनिधीशी दिलखुलास गप्पा मारल्या. अनेक खेळाडू पहिल्यांदा राज्याबाहेर आल्या आहेत. त्या येथील अनुभव तिथे जाऊन शेअर करतील, त्यातून आणखी मुलींना प्रेरणा मिळेल, संवाद होईल, असा आशावाद तिने व्यक्त केला.

रुबिया सैद म्हणाली, ''मी सध्या जम्मू आणि काश्मीरच्या संघाची कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. रणजी ट्रॉफीसाठी तसेच भारतीय संघासाठीही खेळले आहे. अनंतनागमधील धरमिंदर यादव यांनी असीम फाउंडेशनबरोबर क्रिकेट सामन्यासाठी जायचे आहे असे ठरले. राज्यातून चार-पाच संघांशी संपर्क साधला आणि टीम तयार झाली. लॉकडाऊनमुळे सराव पूर्णपणे थांबला होता.

ऑक्टोबरपासून सरावाला सुरुवात झाली.''

''मेट्रो शहरांमध्ये क्रिकेटचे खूप प्रोत्साहन मिळते. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती थोडी वेगळी आहे. हिमवृष्टी सुरू असेल तर खेळ, प्रवास सगळे ठप्प होते. तिथे

खाजगी प्रशिक्षण संस्था नाहीत, व्यवसायिक प्रशिक्षण, सुविधाही फारशा नाहीत. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असतील तर दोन दिवस आधी मुलींना एकत्र बोलावले जाते, ट्रायल घेतली जाते आणि टीम तयार होते. मात्र, मुली जिद्दी आहेत आणि स्वतःला सातत्याने सिद्ध करत आहेत. या प्रवासात पालकांचा पाठिंबा आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो.'' काश्मीरमधील नागरिकही इतर देशवासीयांप्रमाणेच आहेत, त्यांनाही इतरांसारख्या भावना आहेत, दैनंदिन व्यवहार आहेत, याकडे तिने लक्ष वेधले.

-----

शिक्षणही पुण्यात घेणार

सना शौकतने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. ती म्हणाली, ''पहिल्यांदा खेळण्यासाठी राज्याबाहेर आलेय. पुण्यातील राहणीमान, वातावरण छान आहे.

माझे वडीलही बरोबर आले आहेत. पुढील शिक्षणही पुण्यात घेण्याचा विचार आहे.''