शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, गाड्यांच्या सीटही फाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:06 IST

आबालवृद्धांना धोका : बंदोबस्त करण्याची होतेय मागणी

महाळुंगे : महाळुंगे परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरातील नागरिकांना अनेक वेळा कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना ताज्या असताना मोकाट कुत्र्यांनी आता मोटारसायकल लक्ष्य केले आहे. रात्रीच्या वेळी गावातील अनेक मोटारसायकलच्या बैठकीचा चावा घेतला आहे. त्यामुळे आता रात्रीच्या वेळी मोटारसायकल ठेवायच्या कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

येथे काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सर्व नागरिकांना खूप त्रास होत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, मोटरसायकल यांच्यावर अचानक मोकाट कुत्री हल्ला करतात. त्यामुळे अनेक जण जखमीसुद्धा झाले आहेत. याची प्रशासनाने दखल घ्यावी. कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, मोठ्या संख्येने कळपात फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे नागरिक व लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. २५ ते ३०च्या संख्येत मोठ्या कळपस्वरूपात ही कुत्री एखादे जनावर किंवा रस्त्याने जाणाºया नागरिकांच्या गाड्यांच्या मागे लागतात. विशेषत: मुली व स्त्रियांना याचा मोठा त्रास होत आहे.महाळुंगे औद्योगिक वसाहतीत भटक्या मोकाट फिरणाºया कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे परिसरात राहणाºया नागरिक, आबालवृद्ध, शालेय विद्यार्थी तसेच लहान मुलांना कधीही कुत्री चावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.गाड्यांच्या सीट फाडल्यामहाळुंगे परिसरातील खराबवाडी, खालुंब्रे, वाघजाईनगर, आंबेठाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री फिरत असतात. अनेक वेळा वाहन चालवणाºया नागरिकांच्या मागे कुत्री धावतात, लहान मुले, महिलांमध्येही भीती पसरली आहे. अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे.अनेक गाड्यांच्या बेठकीच्या जागाही कुत्र्यांनी फाडून नुकसान केले आहे. तरी त्यांचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा