शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:39 IST

कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या बारामती येथील शेतक-याने कांदा फुकट वाटला.

बारामती : कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या बारामती येथील शेतक-याने कांदा फुकट वाटला. कांदा नेणाºयांनी स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठविण्यात येणार आहेत. असा फलक याठिकाणी लावून या शेतकºयांने अनोख्या पद्धतीने शासनाच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध केला आहे.बारामती नगरपालिकेसमोर जैनकवाडी येथील तरुण शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी आपल्या श्रेयश व प्रसाद या दोन मुलांसह नागरिकांना कांदा फुकट वाटला. दिनेश काळे म्हणाले की, जैनकवाडी परिसरात माझे अडीच एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये मी कांद्याची लागवड केली. दीड एकरात १५० बॅग कांदा झाला. त्यापैकी १२० बॅग कांद्याची कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये केवळ १२ हजार रुपयांमध्ये विक्री केली.कांद्यासाठी एकरी ४५ हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र एकरातील कांद्याचे केवळ १२ हजार रुपये आले. त्यामुळे राहिलेला दीड टन कांदा आता नागरिकांना फुकट वाटत आहे. काही नागरिकांनी पैसे दिले तर ते पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार आहे. शासनाला शेतकºयाची खरी अवस्था कळावी यासाठी फुकट कांदा वाटत आहे, असे काळे यांनी सांगितले.>नागरिकांनी दिला आंदोलनाला पाठींबाकाळे यांनी लावलेल्या फलकावर ‘शेतकरी बांधवांना मागील ४ वर्षांपासून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव आपल्यावर खुश आहोत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन’ असा उपरोधिक मजकूर देखील लिहिला आहे. त्यांच्या सोबत आठवीत शिकणारा मोठा मुलगा श्रेयश व सहावीत शिकणारा लहान मुलगा प्रसाददेखील शाळा बुडवून वडिलांना मदत करत होते.काही नागरिकांनी काळे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.