शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे हॅश टॅग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:01 IST

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्यासंदर्भात १८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हॅश टॅग आंदोलन करण्यात येणार आहे

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मागण्यांचा पाऊस पाडला जाणारअभिनव आंदोलन : एकाच दिवशी राज्यभरातून पडणार मागण्यांचा पाऊस सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहचविण्याचा निर्णय

पुणे : राज्यभरात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना प्रत्यक्षात भरतीसाठी निघणाºया अल्प जागा, शासकीय कर्मचाऱ्यांचे वय ५८ ऐवजी ६० करण्याचे चालू असलेले प्रयत्न, कंत्राट पध्दतीचा मोठयाप्रमाणात अवलंब, महापरीक्षा पोर्टलव्दारे होणारा गैरकारभार याविरोधात सोशल मीडियावरून पोस्ट करीत ‘हॅश टॅग’ आंदोलन केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मागण्यांचा पाऊस पाडला जाणार आहे.हॅश टॅग आंदोलन सोमवारी (दि. १८ जून) रोजी केले जाणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमधून मोर्चे काढून त्यांनी त्यांच्या मागण्या शासनापुढे ठेवल्या होत्या. त्याचबरोबर पुणे ते मुंबई असा लॉग मार्चही या विद्यार्थ्यांनी काढला. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून ठोस पावले उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहचविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. किमान यामुळे तरी राज्य सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा उमेदवारांतून व्यक्त होत आहे. राज्य शासनाकडील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, सेवा निवृत्तीचे वय ५५ करण्यात यावे,कंत्राट पद्धतीने नोकर भरती येऊ नये, संयुक्त परीक्षा गट- ब याची जाहिरातीच्या पदसंख्येत वाढ करावी, तलाठीची भरती एमपीएससीद्वारे व्हावी, उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी, सर्व परीक्षा सीसीटीव्ही व मोबाईल जॅमर नियंत्रण कक्षेत आणावेत, राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र मुख्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, प्रतीक्षा यादी लावण्यात यावी आदी मागण्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शासनापुढे मांडल्या जाणार आहेत. राज्यभरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी १८ जून रोजी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिवसह सर्व मंत्र्यांना फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून हॅश टॅग करण्याचे असे आवाहन एमपीएससी स्टुडंट राईटसतर्फे करण्यात आले आहे. ..............निवृत्तीचे वय ६० नव्हे ५५ व्हावेशासनाच्या अधिकारी व कर्मचारी संघटनांकडून निवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० करावे यासाठी शासनावर मोठयाप्रमाणात दबाव निर्माण केला आहे. यापार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. उलट निवृत्तीचे वय ५८ नव्हे तर ५५ करण्यात यावे अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निवृत्ती वयाचा मुदद लावून धरल्याने शासना पुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.असे होता येईल आंदोलनात सहभागीस्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्यासंदर्भात १८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हॅश टॅग आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्र्यांना फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करायच्या आहेत. सर्वांनी मागण्या नोंदविताना  #MPSC-STUDENTS-RIGHTS हा हॅश टॅग वापरायचा  आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस