शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

देहूनगरीमध्ये हरिनामाचा अखंड गजर

By admin | Updated: March 12, 2017 03:20 IST

जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराममहाराज बीजोत्सव मंगळवारी आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी ग्रामपंचायतीसह विविध विभाग आपापली कामे करण्याची कसरत करीत आहे.

देहूगाव : जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराममहाराज बीजोत्सव मंगळवारी आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी ग्रामपंचायतीसह विविध विभाग आपापली कामे करण्याची कसरत करीत आहे. मंगळवारपूर्वी कामे पूर्ण होतील, असा प्रशासनाला विश्वास आहे. देहूनगरीमध्ये हरिनामाचा गजर सुरू आहे.विविध दिंड्या व फड दाखल झाले असून, परिसरातील भाविकांसह विविध दिंडीचालकांचे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले असून, त्यांच्या परिसरात हरिनामाचा गजर हा टिपेला पोहोचला आहे. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात यात्रा स्पेशल हॉटेल व्यावसायिक व विविध वस्तूंचे विक्रेते, प्रसादाची दुकाने येऊन दाखल झाली असून, त्यांची दुकाने लावण्याची लगबग सुरू आहे.वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी महसूल विभाग, विद्युत, आरोग्य, जीवन प्राधिकरण, श्री संत तुकाराममहाराज संस्थान, ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, आपापल्या परीने भाविकांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये याची दखल घेत आहेत. या सर्व कामकाजावर नायब तहसीलदार संजय भोसले, हवेली पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, हवेली पंचायत समिती सदस्य हेमलता काळोखे, ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी ग्रामसेवक गणेश वालकोळी, सरपंच सुनीता टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देहू-आळंदी रस्ता व देहू-देहूरोड रस्त्यावरील झेंडेमळ्यापर्यंतचे खड्डे बुजविले असल्याने यात्रा काळात भाविकांना खड्ड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. पाटबंधारे विभागाच्या वतीने इंद्रायणी नदीला पाणी सोडण्यात आले असून, भाविकांच्या स्नानासाठी पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. देहूगावातील वैकुंठगमन रस्ता ते गाथा मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना यात्रा स्पेशल हॉटेल, विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाचे बाह्यरुग्ण विभाग कार्यरत झाले असून, रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंदिर परिसरात पालखी मार्गावर पीसीसी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.