शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

हृदयावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

By admin | Updated: September 20, 2016 01:31 IST

हृदयावरील उपचारांमध्ये अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची समजली जाणारी एएफ अ‍ॅबलेशन ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीपणे करण्यात आली.

पुणे : हृदयावरील उपचारांमध्ये अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची समजली जाणारी एएफ अ‍ॅबलेशन ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ३ डी मॅपिंग आणि कॉन्टॅक्ट फोर्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ससून शासकीय रुग्णालयातील कॅथलॅबचे यामध्ये मोठे योगदान असून महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ७४ वर्षे वयाच्या महिलेवर हृदयविकाराचे ठोके अनियमित असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या महिलेला काही दिवसांपासून श्वासोच्छ्वासास त्रास होणे, दम लागणे, छातीत धडधड होणे या तक्रारी होत्या. रुग्ण महिलेवर विविध औषधोपचार करूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च परवडण्यासारखा नव्हता. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजकुमार मंत्रवादी डॉ. हेमंत कोकणे यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यामध्ये डॉ. कल्पना केळकर व डॉ. योगेश गवळी यांनी भूलतज्ज्ञ म्हणून काम केले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले व कॅथलॅबचे प्रमुख डॉ. एन. जी. करंदीकर यांनी सहकार्य केले. ससून रुग्णालयात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, हृदयातील छिद्र बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेने बुजविणे यांसारखे अनेक उपचार मोफत केले जातात. आता हृदयाचे ठोके अनियमित पडणे या गुंतागुंतीवरही उपचार उपलब्ध झाल्याने गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.