शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

..घरकुलवाले पाय पसरी!

By admin | Updated: December 20, 2014 00:16 IST

घरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी २००८ पासून तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा केलेल्या घरकुल लाभार्थींपैकी काहींना नशिबाने साथ दिली.

रिटा कदम, पिंपरीघरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी २००८ पासून तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा केलेल्या घरकुल लाभार्थींपैकी काहींना नशिबाने साथ दिली. २०१४ मध्ये त्यांना स्वस्तातील घरकुल मिळाले. भूखंड आणि सदनिकांचे दर गगनाला भिडले असताना या शहरात हक्काच्या घराचे स्वप्न साकारणे धूसर झाले होते. अशा परिस्थितीत हक्काचे घरकुल मिळाले. अवघ्या पावणेचार लाखांत, तेही सुलभ हप्त्याने घरकुलाचा ताबा मिळाला. ताबा मिळाल्यानंतर वर्ष पूर्ण होण्याअगोदरच काहींनी गॅलरीत दुकान थाटले आहे. दिली ओसरी, घरकुलवाले पाय पसरी अशी परिस्थिती घरकुल प्रकल्पाच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनर्निर्माण विकास अभियानांतर्गत (जेएनयूआरएम) महापालिकेने शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरकुल प्रकल्प राबवला आहे. १३ हजार २५० घरांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ६७२० लाभार्थ्यांना घरकुल बांधून दिली आहेत.निधीची कमतरता भासल्याने दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प बारगळला. उर्वरित संभाव्य लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. ज्यांना घरकुल मिळाले, त्यांनी मात्र लगेच मनमानी सुरू केली आहे. राहण्यासाठी मिळालेल्या घरकुलात अशा प्रकारे विनापरवाना दुकान थाटून पैसे कमाविण्याचा पर्याय काही रहिवाशांनी शोधला आहे. किराणा मालाचे दुकान, गुटखा, पान-बिडी विक्री अशा स्वरूपाची दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. अतिशय धोकादायक पद्धतीने दुकाने चालवली जात आहेत. शहरातील इतर किराणा दुकानात साहित्य असते, त्याच प्रकारे घरकुलच्या बाल्कनीत दुकाने थाटण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचे शॉप अ‍ॅक्ट परवाना नाही की, अधिकाऱ्यांची परवानगी नाही अशा स्वरूपात वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. कुलस्वामिनी आणि कल्पतरू या घरकुल इमारतींवरून पडून दोन तरूणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बाल्कनीतून पडून मृत्यू होण्याच्या घटनांमुळे घरकुल प्रकल्प चर्चेत आला असताना अशा पद्धतीची धोकादायक दुकाने थाटली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घरकुलमध्ये या ना त्या कारणाने अपघात झाले आहेत. कित्येक वेळा बेल वाजली की, घरातील लहान मुले धावत बाल्कनीत येतात आणि खाली वाकून वस्तूची सेवा पुरवतात. आधीच धोकादायक कठड्यांवरून होणारी अपघातांची मालिका आणि यात कुटुंबीय आपल्या चिमुरड्यांचा जीव धोक्यात टाकत आहेत. घरकुलात राहण्यास येण्याअगोदर अनेक रहिवाशांनी ठिकठिकाणी दुकानांचे फलक लावण्याची घाई केली आहे.