शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सखी अनुभवणार ‘जल्लोष २०१५’

By admin | Updated: February 22, 2015 00:54 IST

सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे.

पुणे : मैत्रीण, मुलगी, बहीण, पत्नी, आई, सासू... अशा विविध नात्यांची गुंफण घालत पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे. लोकमत सखी मंच आणि राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या (अमरीश जैैन ग्रुप) वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका नात्यांमधील अतूट बंध मनोरंजनातून सखींसमोर उलगडतील. म्हात्रे ब्रिज एरंडवणे येथील अमित गायकवाड ग्रुप यांच्या कृष्णसुंदर गार्डन येथे सोमवारी (दि. २३) हा कार्यक्रम रंगणार आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखासाठी झटणारी स्त्री समाजातही आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मान-सन्मान मिळविते. अनेक नातेसंबंध जपत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करते. कुटुंबासह समाजातील विविध जबाबदाऱ्या लीलया पार पाडत यशाचे शिखर गाठते. या सखींचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमत सखी मंचने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘जल्लोष २०१५’ हा त्यातीलच एक उपक्रम आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून थोडीशी उसंत काढत त्यांना मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकमत सखी मंचच्या सभासदांना या मैफलीत सहभागी होता येईल. स्त्रियांच्या जीवनातील विविध टप्पे, त्यांनी मिळविलेले यश, विविध नातेसंबंध जपताना करावी लागणारी तारेवरची कसरत... असे सारे काही गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून मनोरंजकरीत्या या कार्यक्रमातून उलगडताना सखींना अनुभवता येईल. मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या या अनोख्या मैफलीने कार्यक्रमात धम्माल येणार आहे. हिंदी गाणी, शेतकरी नृत्य, लावणी आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रमांचा नजराणा या मैफलीत असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सखींमधून लकी ड्रॉ काढला जाणार आहे. मनोरंजनाबरोबर सोन्या- चांदीची लयलूट करण्याची सुवर्णसंधी सखींसाठी अनोखी भेट असणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक अमित गायकवाड ग्रुप यांचे कृष्णसुंदर गार्डन आहे. या कार्यक्रमाकरिता सर्व सखी मंचच्या सभासदांना प्रवेशिकेवर प्रवेश मिळेल.(प्रतिनिधी)सोने व चांदीचा निघणार लकी ड्रॉ४१००००० सोने प्रथम पुरस्कार४७५००० सोने४५०००० सोने४२५००० चांदी तृतीय पुरस्कारउत्तेजनार्थ तीन पुरस्कार४यासह विविध नृत्य व गाण्यांचा जल्लोष४यासह उपस्थित सखींमधून निघणार ३० लकी ड्रॉची बक्षिसे