शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीवारी होणार निर्मल

By admin | Updated: May 12, 2017 05:16 IST

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. यंदा महापालिकेच्या वतीने निर्मलवारी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. यंदा महापालिकेच्या वतीने निर्मलवारी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यात शहरात पाचशे मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. पाणी, स्वच्छता आणि आरोग्य विषयक सुविधा देण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत निश्चित केले.आषाढीवारी पालखी सोहळा नियोजनासाठी पालिकेत बैठक झाली. बैठकीस महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके, कार्यकारी अभियंता एम. एम. चव्हाण, सतीश इंगळे, जयंत बरशेट्टी, प्रमोद ओंभासे, प्रवीण घोडे, विशाल कांबळे, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत, मिनिनाथ दंडवते, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, सहायक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, व्ही. के. बेंडाळे, तुकाराम तनपुरे, रमेश ओतारी, प्रकाश मिर्झापुरे, सूर्यकांत बटसावडे, चंद्रकांत पवार, स्मिता डेरे, विनिता अंब्रेकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथियान, शिवदास कोळी, आर. जी. फाटके, प्रभाकर धनोकर, रमेश जाधव, गणेश चौधरी, संदेश गोलांडे, रमेश सरदेसाई आदी उपस्थित होते.आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना योग्य ती मदत करावी. पालखी सोहळा शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. वारकरी व भाविक यांच्या संख्येनुसार स्वच्छतागृहांच्या संख्येत वाढ करावी. पालखी मार्गस्थ झाल्यावर रस्त्याची स्वच्छता करावी. पालखी सोहळ्या समवेत पाण्याचे टँकर व वैद्यकीय सेवा सुविधांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्याच्या सूचनाही केल्या.