वरवंड : भीमा पाटस साखर कारखाना सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल. आमदार राहुल कुल कारखान्याला नवसंजीवनी देण्यासाठी माझ्याकडे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. भीमा पाटस कारखाना लवकरच सुरु केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या वरवंड (ता.दौड़) येथील सभेत ते बोलत होते. दौंड तालुक्यातील गरीब जनतेने पंतप्रधान आवास योजनेचा प्रस्ताव आमदार राहुल कुल यांच्याकडे द्यावा, त्यानुसार सर्व लोकांना घरे दिली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, की माजी पालकमंत्री अजित पवार यांनी दिवसभर नारळ फोडायचे आणि रात्री माणसे तोडायचे एवढेच काम केले आहे. मात्र आम्ही माणसं जोडण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्यात देखील आता फक्त बारामती पुरता मर्यादित राहिला आहे. नगरपालिका निवडणुकांच्या वेळी सदर गोष्ट सिद्ध झाल्याचा दाखला यावेळी बापट यांनी दिला. पुणे जिल्हा परिषदेत आता बदल करायची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले़
भीमा-पाटसला देऊ मदतीचा हात
By admin | Updated: February 15, 2017 01:57 IST