शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सांगवी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा : ग्रामस्थांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 14:45 IST

वर्षानुवर्ष कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदल्याची मागणी 

सांगवी : सांगवी (ता. बारामती ) ग्रामपंचायतीकडून अपुरा,अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना राबवून स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास महिला व आबालवृद्धांसह ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच भानुदास जगताप यांनी ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे दिला आहे.

सध्या जिल्ह्यात सामाधानकारक पाऊस झाला असताना देखील परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. पाणी मुबलक असून देखील पाणी पुरवठ्याच्या योग्य नियोजन अभावी मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सांगवी गावात दोन दिवसाआड दूषित व अपुऱ्या पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. मिलिंदनगर येथे वर्षानुवर्ष पाण्याचा प्रश्न कायम असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावात दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तीन ते चार दिवस पाणी कसे पूरवायचे हा मोठा प्रश्न आता ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायतीची दीड लाख क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. पाणी पुरवठा करत असताना पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली असताना सोडल्यास पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत असतो,गावात इतर ठिकाणी पूर्वीपासून चार इंच पाईपलाईन आहेत. तर मिलिंदनगर येथे तीन इंच पाईपलाईन असल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यातही तीन दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने आता संतप्त महिलांनी शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे....................................मिलिंदनगर परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य ती काळजी घेऊन स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार आहोत. 

- चंद्रकांत तावरे, सरपंच सांगवी ग्रामपंचायत........................सध्या कॅनॉलच्या कामकाजामुळे साठवण तलावात पाणी अल्प प्रमाणात असल्याने पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मागील महिनाभरापूर्वी जल प्राधिकरणाने सांगवीतील जुन्या पाण्याच्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गावातील सर्वच नवीन जलवाहिन्यांचे नव्याने कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे चालत असलेली पाण्याची समस्या मिटणार आहे. - संजय चांदगुडे, ग्रामविकास अधिकारी. 

टॅग्स :BaramatiबारामतीMorchaमोर्चाgram panchayatग्राम पंचायतWaterपाणी