शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीवरील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 03:02 IST

वाणेवाडी, नगदवाडी कांदळी, हिवरेतर्फे नारायणगाव वनहद्दीत येणाऱ्या नारायणगड परिसरात आदिवासी समाजातील लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुरुवारी सकाळपासून वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हाती घेतली.

कांदळी वडगाव  - येथील वाणेवाडी, नगदवाडी कांदळी, हिवरेतर्फे नारायणगाव वनहद्दीत येणाऱ्या नारायणगड परिसरात आदिवासी समाजातील लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुरुवारी सकाळपासून वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हाती घेतली. या कारवाईत एकूण ६३ कुटुंबांच्या झोपड्या हटविण्यात आल्या. उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर, आंबेगाव आणि खेड येथील १५० हून अधिक वनसंरक्षकांनी ही कारवाई केली.नारायणगड परिसरातील वनविभागाच्या जागेवर काही आदिवासी नागरिकांनी झोपड्या बांधून अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वनविभागाने यासंदर्भात या समाजाच्या लोकांना वेळोवेळी जाहीर नोटिसा देऊन सुचित केले होते. परंतु; त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने जुन्नर येथील वनविभागाचे अधिकारी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर, आंबेगाव आणि खेड येथील १५० हून अधिक वनसंरक्षकांनी धडक कार्यवाही केली. या मोहिमेत आदिवासी समाजाच्या एकूण ६३ कुटुंबांच्या झोपड्या पाडण्यात आल्या. परंतु; यावेळी आदिवासी समाजाची लोकं त्याठिकाणी उपस्थित नव्हती. या कार्यवाही दरम्यान जुन्नरचेतहसीलदार किरण काकडे, जुन्नरचे पोलीस उपाधीक्षक राम पठारे, नारायणगाव सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड कार्यवाही दरम्यान उपस्थित होते.वनविभागाच्या जागेवर मागील वर्षी लोकशासन आंदोलकानी अतिक्रमण केले होते. त्यावेळी देखील अशाच पद्धतीने वनविभागाने कार्यवाही केलेली होती. परंतु, त्यावेळी कार्यवाहीला हिंसक वळण लगले होते. त्यामुळे प्रशासनाने अगोदरच काळजी घेत या समाजातील विध्वंसक प्रवृत्तीच्या १३ लोकांना दि.१३ जून रोजी हिवरेतर्फे नारायणगाव येथून अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.भोळ्या लोकांना दिला जातोय चुकीचा सल्ला1या आदिवासी समाजातील लोकांना अतिक्रमण करा, असा सल्ला दिला जातो. तुम्ही वर्षानुवर्षे त्याठिकाणी राहिलात तर तुम्हाला ती जमीन मिळेल, अशी चुकीची माहिती पुरविली जाते.2यामुळे हा समाज वारंवार अतिक्रमण करतो, अशी प्रतिक्रिया जुन्नरचे वनविभागाचे अधिकारी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी दिली. परंतु, अशा चुकीच्या पद्धतीने केलेल्या अतिक्रमण कायद्याच्या विरोधात आहे आणि अशा जबरदस्तीने केलेल्या हस्तगत केलेल्या जमिनी शासन कुणालाही देत नाही, असेही ते यावेळी म्हणाले व अशा प्रवृत्तीच्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकडे मागेपुढे पाहणार नाही, अशी तंबी यावेळी दिली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या