शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

२१ व्या शतकात निम्मे तरुण नोकरीस अपात्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:36 IST

२०३० मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याअभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे.

- नेहा सराफ पुणे : २०३० मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याअभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे. युनिसेफच्या प्रमुख हेंद्रिटा फोर यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या अभ्यासात भारतासह बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतान, मालदीव, श्रीलंका या देशांचा समावेश आहे.दररोज दक्षिण आशियाई देशांमधून सुमारे १ लाख तरुण हे नोकरी वतुर्ळात आशेने प्रवेश करतात. आधीच जागतिक मंदीमुळे दक्षिण आशियातले देश कठीण कालखंडातून जात आहेत. सध्या या देशातले हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. त्यातच भविष्यात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य अभावामुळे होणारे नुकसान मोठे असणार आहे. फोर यांच्या मते, कुशल तरुणांच्या कौशल्याचा परिणाम हा थेट त्या देशाचा आर्थिक विकासावर होतो. भारतात सध्या अशा तरुणांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातही बेरोजगारीचा अधिक फटका बसू शकतो असा इशाराही यात देण्यात आलेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेच्या मते बेरोजगारीचा दर सध्या ८.४५ टक्के आहे. आॅटो, टेलिकॉम आणि आयटीसारख्या क्षेत्रात हा दर अधिक असल्याचे दिसत आहे.>ठळक मुद्देकौशल्याअभावी भविष्यात लाखो विद्यार्थी नोकरीविनाभारताला बसणार सर्वाधिक फटकाबांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान,भूतान, मालदीव, श्रीलंकेलाहीभेडसावणार प्रश्न>हे उपाय आवश्यकसरकारकडून वेळोवेळी बाजारात नोकरीच्या संधी असणाऱ्या क्षेत्राचे परीक्षणशिक्षण देताना लेखी शिक्षणासोबत प्रात्यक्षिकावर भर देण्याची गरजकरिअरचे पारंपरिक पर्याय न निवडता वेगळ्या संधींची निवड>दक्षिण आशियातील देशांमध्ये कौशल्यविकासासह शिक्षण घेण्याचे प्रमाणदेशाचे नाव २०१९ २०१३ (अंदाज)बांगलादेश २६% ५५%भूतान ४७% ८१%भारत १९% ४७%मालदीव १६% ४६%नेपाळ १८% ४०%पाकिस्तान १८% ४०%श्रीलंका ६१% ६८%>मुळात शिक्षणाच्या पद्धतींमध्ये बदल होण्याची गरज आहे. नुसते अभ्यासक्रम तयार करण्यापेक्षा मार्केटच्या गरजा बघून प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. याशिवाय मार्केटच्या गरजा कळण्यासाठी सरकारने किमान सहा महिन्यांनी सर्वेक्षण करावे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अभ्यासक्रम निवडताना समुपदेशन करणे योग्य ठरते.- डॉ. स्वाती मुजुमदार,प्र-कुलगुरू, सिम्बायोसिसकौशल्य विद्यापीठ, पुणे>पाठ्यपुस्तकात सांगितलेल्या अभ्यासाच्या पलीकडे आता प्रात्यक्षिकांवर भर देण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर येणाºया काळात विद्यार्थी मागे पडू शकतात. कौशल्य विकास हा विषय प्रत्येक क्षेत्रात वेगळा असला तरी अत्यावश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा जरूर अभ्यास करावा आणि अनुभव घ्यावा, तरच आगामी काळातल्या बदलांना ते सामोरे जाऊ शकतील.- डॉ. पूजा मोरे,समन्वयक कौशल विकास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ