शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही इंजिनिअरिंगच्या निम्म्या जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:52 IST

विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगला जाण्याचा कमी झालेला कल यंदा जैसे थे राहिला आहे. पुणे विभागातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ५५ हजार ४५९ पैकी २६ हजार ५४८ इतक्या निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

पुणे : विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगला जाण्याचा कमी झालेला कल यंदा जैसे थे राहिला आहे. पुणे विभागातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ५५ हजार ४५९ पैकी २६ हजार ५४८ इतक्या निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत. इंजिनिअरिंगच्या हजारो जागा सातत्याने रिक्त राहू लागल्याने अनेक विनाअनुदानित महाविद्यालये अडचणीत आली आहेत.पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा या ५ जिल्ह्यांमध्ये १४२ इंजिनिअरिंगमध्ये ५५ हजार ४५९ जागांची क्षमता होती. प्रवेशाच्या फेºया संपल्यानंतर केवळ २१ हजार ६७४ जणांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. मॅनेजमेंट कोट्यांतर्गत ४ हजार ६४३ जागा उपलब्ध होत्या; मात्र त्यासाठी केवळ ६४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तब्बल ३ हजार ९९६ जागा रिक्त राहिल्या आहेत. अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या कोट्याबाबतही तीच स्थिती असून १,३८८ पैकी केवळ ५१० जागांवर प्रवेश झाले आहेत. इंजिनिअरिंकडे विद्यार्थ्यांचा कल पुन्हा वाढेल, या अपेक्षेवर कशीबशी तग धरून राहिलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांची स्थिती यामुळे आणखीनच बिकट बनली आहे.इंजिनिअरिंगची पदवी घेऊनही नोकरीच्या अपेक्षित संधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग करण्याचा कल कमी होत आहे. त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेजना मोठ्या प्रमाणात मान्यतांची खैरात वाटण्यात आल्यानेही परिस्थिती उद्भवली आहे. विद्यार्थ्यांकडून तांत्रिक शिक्षणासाठी दहावीनंतरच इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. हा डिप्लोमा केल्यानंतर थेट डिग्रीला दुसºया वर्षात प्रवेश मिळतो. मागील वर्षीही राज्यातील एकूण रिक्त जागांची संख्या ६१ हजार व पुणे विभागातील रिक्त जागा ३० हजार इतक्या राहिल्या होत्या.इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, सिव्हील आदी शाखांना पसंती दिलेली आहे. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा खर्चही आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने अनेक गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घेणे अवघड जाऊ लागले आहे. केंद्र व राज्य शासनांकडून ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली असली, तरी अंमलबजावणीच्या स्तरावर अजूनही फारशा हालचाली झालेल्या नाहीत.काही नामवंत महाविद्यालयांतून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे मिळणाºया नोकºयांचा अपवाद वगळता इंजिनिअरिंच्या पदवीवर नोकरी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकºया उपलब्ध व्हाव्यात, तसेचत्यांना लघुउद्योग करून स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.