शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

By admin | Updated: January 4, 2016 00:53 IST

महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी अभिवादन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस पिंपरी चौकातील महात्मा फुले

पिंपरी : महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी अभिवादन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस पिंपरी चौकातील महात्मा फुले पुतळ्याजवळ व मोशी येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आयुक्त राजीव जाधव व स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण केली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही महापौर धराडे, उपमहापौर वाघेरे, आयुक्त जाधव व स्थायी समिती सभापती शितोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.महापालिका भवनात व पिंपरी चौकातील महात्मा फुले पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, माजी वृक्षप्राधिकरण समिती सदस्य आनंदा कुदळे, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता महावीर कांबळे, सहायक आयुक्त दत्तात्रय फुंदे, चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, देवण्णा गट्टूवार, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, रामकिसन लटपटे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी उपस्थित होते. मोशी येथील कार्यक्रमास नगरसदस्य धनंजय आल्हाट, अरुण बोऱ्हाडे, नगरसदस्या मंदा आल्हाट, मुख्याध्यापिका रतन डुंबरे, पुष्पा माने, सामाजिक कार्यकर्ते दिलीप बोराटे, महात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महापौर धराडे व नगरसदस्य बोऱ्हाडे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी संबोधित केले. बोदडे यांनी सूत्रसंचालन केले.भारतीय बौद्ध महासभाभारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने जयंती दिन सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाबुद्धविहार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मोहननगर, महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पमाळा अर्पण करुन वंदन करण्यात आले. सामुदायिक वंदना, महाबुद्धपूजा पाठ संकल्प, गाथा पठन, आंबेडकरांनी दिलेल्या धम्म प्रतिज्ञा सामुदायिकपणे ग्रहण करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पंडीत जाधव, भदन्त महाथेरो, डी.के.तांबे, संदिपान गायकवाड, व्ही.बी.सोनवणे, पंचशीला तांबे, विशाखा कांबळे, सुरेखा आरावाडे, नमिता जाधव, सुनंदा वाघमारे उपस्थित होते.ज्ञानप्रभात विद्यामंदिरडॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालयामध्ये संस्थेचे संस्थापक विठ्ठल गवळी, निळकंठ लांडगे, बाळासाहेब सावंत, सुमन गवळी, प्रज्ञा सोनवणे, राहुल गवळी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सावित्रीबार्इंच्या जीवनकार्यावर भाषणे केली. संस्थेच्या अध्यक्षांनी सावित्रीबार्इंची कार्याची महती कथीत केली व स्त्री-शिक्षणाचे महत्व समजाऊन सांगितले. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनरिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात सावित्रीबाईंच्या पुतळ्यास फेडरेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे रिपाईचे नेते सम्राट जकाते, रिपाई महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, दिपक ओव्हाळ, सतिश कसबे, नारायण वानखेडे, प्रकाश चांदमारे उपस्थित होते.रिपब्लिकन सेनासावित्रीबाई यांच्या तैलचित्रास रिपब्लिकन सेनेतर्फे शहराध्यक्ष नीलेश जगताप यांनी पुष्पहार अर्पण केला. फुले-शाहू-आंबेडकर विचार विकास प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हरीष डोळस, पांडुरंग डोंगरे, सुभाष बनसोडे, संतोष सकपाळ, बाळासाहेब गायकवाड, अनिल डोळस, कमल धुळधुळे, विद्या नासे, प्रफुल्ल गायकवाड, किरण पंडित उपस्थित होते. (प्रतिनिधी)